Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतासाठी चांगला दिवस! कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या एक कोटीच्या पुढे!!

बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण उपचाराधीन रुग्णांच्या ४४ पट अधिक

January 10, 2021
in चांगल्या बातम्या
0
fighting-coronavirus-innovations

कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताने आज महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. कोरोनामुक्त झालेल्यांच्या एकूण संख्येने १ कोटीचा आकडा (१०,०१६,८५९) ओलांडला आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.

 

गेल्या २४ तासांत १९ हजार ५८७ रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले  आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर आता वाढून ९६.३६% झाला आहे. मात्र, सक्रिय रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण यातील अंतर  सतत वाढत आहे. ही संख्या ९७,८८,७७६ एवढी आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण उपचाराधीन रुग्णांच्या  ४४ पट आहे.

 

देशातील एकूण बाधितांची संख्या आज २ लाख २८ हजार 83 इतकी असून एकूण बाधित रुग्णांच्या केवळ २.१९% एवढी आहे. तसेच बरे झालेल्या एकूण रुग्णांपैकी  ५१% रुग्ण  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ अशा पाच राज्यांत केंद्रित आहेत.

 

रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९६.३६%  आहे. त्याचबरोबर सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा रुग्ण बरे होण्याचा  दर देखील ९०% पेक्षा जास्त आहे. भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर जगात सर्वाधिक आहे. बाधित रुग्णांची अधिक संख्या असलेल्या देशांचा रुग्ण बरे होण्याचा दर भारताच्या तुलनेत कमी आहे.

 

चाचणी पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे भारताचा सकारात्मकता दरही खाली आला आहे. दैनिक सकारात्मकता दर ३ टक्क्यांच्या खाली आहे. तसेच १७ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा साप्ताहिक सकारात्मकता दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. दरम्यान ६ जानेवारीला बरे झालेल्या रुग्णांपैकी ७९.८ टक्के हे  १०  राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

 

तसेच केरळमध्ये काल  एका दिवसात सर्वाधिक ५ हजार ११० रुग्ण बरे झाले असून त्यापाठोपाठ महाराष्ट्रात  २ हजार ५७० रुग्ण बरे झाले आहेत. तर नवीन बाधित रुग्णांपैकी ८३.८८% रुग्ण  १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. केरळमध्ये गेल्या २४ तासांत ६ हजार ३९४ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात ४ हजार ३८२ नवीन रुग्णांची नोंद झाली तर छत्तीसगडमध्ये काल १ हजार 50  नवीन रुग्ण आढळले. तसेच गेल्या २४ तासांत २२२ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यापैकी ६७.५७% हे सहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशातले आहेत.

 

महाराष्ट्रात काल एकाच दिवसात सर्वाधिक मृत्यूची  (६६ मृत्यू) नोंद झाली.  केरळमध्ये २५  तर पश्चिम बंगालमध्ये २२ नवीन मृत्यूची नोंद झाली.

 


Tags: Corona Viruscovid-19Good day for IndiaIndiaMaharastraकोरोनाकोरोना विषाणूकोव्हिड-१९महाराष्ट्र
Previous Post

गॅस एजन्सी मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणुक; एक महिलेसह सहा जण अटकेत

Next Post

The First All-Electric Performance Suv, ‘JAGUAR I-PACE LANDS’ On Indian Shores

Next Post
Jaguar I-PACE

The First All-Electric Performance Suv, 'JAGUAR I-PACE LANDS' On Indian Shores

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!