Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकरी हत्याकांड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सरकारला फटकारले

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे. गेल्या सुनाणीत न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला पुढील सुनावणीपूर्वी २० ऑक्टोबर रोजी उत्तर दाखल करण्यास सांगितले होते, मात्र या प्रकरणी अहवाल उशिरा दाखल केल्याबद्दल न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे. बुधवारी पुन्हा सुनावणी झाली. सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी उत्तर प्रदेश सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांना सांगितले की, आम्ही काल रात्री १ वाजेपर्यंत तुमच्या उत्तराची वाट पाहत होतो.

 

रात्री उशीरा न्यायालयाला अहवाल!

  • बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील साळवे म्हणाले की, आम्ही काल बंद कव्हरमध्ये अहवाल सादर केला आहे.
  • यावर सरन्यायाधीश म्हणाले की, जर तुम्ही शेवटच्या क्षणी अहवाल दिलात तर आम्ही ते कसे वाचू शकू? किमान एक दिवस अगोदर देणे आवश्यक आहे.
  • उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणात इतर साक्षीदारांचे जबाब का नोंदवलेले नाहीत, असा सवालही न्यायालयाने केला.
  • न्यायालयाने सांगितले की तुम्ही १६४ पैकी फक्त ४४ जणांचे जबाब नोंदवले आहेत, असे का?

 

गेल्या सुनावणीतही न्यायालयाने फटकारले!

  • लखीमपूर प्रकरणाच्या शेवटच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला तपासाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत फटकारले होते.
  • न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारचे वकील हरीश साळवे यांना विचारले की, खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपीला अटक का केली नाही?
  • हे करून तुम्हाला कोणता संदेश द्यायचा आहे?

 

एसआयटीला मिळाले गोळीबाराचेही पुरावे!

  • एसआयटीला लखीमपूर हत्याकांडदरम्यान गोळीबार झाल्याचे पुरावे मिळाले आहेत.
  • आता हे स्पष्ट होणे बाकी आहे की गोळी कोणी मारली? यासाठी पोलीस बॅलिस्टिक अहवालाची वाट पाहत आहेत.
  • केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा आरोपी मुलगा आशिष वगळता उर्वरित आरोपींनी कबूल केले आहे की ते त्यावेळी घटनास्थळी होते.
  • त्यांनी असेही म्हटले आहे की ते उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांच्या स्वागतासाठी गेले होते.
  • या दरम्यान त्यांना गर्दीने घेरले आणि त्यांनी गर्दी पांगवण्यासाठी गोळीबार केला.

Tags: lakhimpurSupreme CourtUttarpradeshउत्तर प्रदेशच्यालखीमपूर-खेरी
Previous Post

आर्यन खानचा जामीन पुन्हा फेटाळला, आता उच्च न्यायालयात जाणार!

Next Post

कोणाच्याही दबावात न येता अनधिकृत बांधकामांवर युद्ध पातळीवर कारवाईचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश

Next Post
uddhav thackrey and bmc

कोणाच्याही दबावात न येता अनधिकृत बांधकामांवर युद्ध पातळीवर कारवाईचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!