Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंधरा दिवसात कळंबोलीच्या कोरोना रुग्णालयाचे हस्तांतरण

March 11, 2021
in सरकारी बातम्या
0
पंधरा दिवसात कळंबोलीच्या कोरोना रुग्णालयाचे हस्तांतरण

 

मुक्तपीठ टीम 

कळंबोलीतील प्रस्तावित कोरोना रूग्णालयाचे येत्या 15 दिवसात पनवेल महापालिकेकडे निश्‍चित हस्तांतरण केले जाईल. त्यानंतर ते लगेचच सुरू करून लोेकसेवेत समर्पित करण्यात येईल, अशी ग्वाही सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र धायटकर यांनी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांना लेखी स्वरूपात दिले आहे. त्यामुळे 5 कोटी रूपये खर्च करून अडगळीत पडलेल्या कोरोना रूग्णालयाची शुभ घटिका समिप आल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

 

पनवेलसारख्या अतिसंवेदनशिल शहराला सिडकोकडून कोविड हॉस्पीटल देण्याचे आदेेश खुद्द नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोचे कामचुकार आणि अतिहुशार समजले जाणारे व्यवस्थापकिय संचालक संजय मुखर्जी यांना दिल्यानंतर त्यांनी स्थानिक राजकीय नेत्यांना गुंडाळून गेल्या पाच महिन्यात अनेकदा आश्‍वासनांचे गाजर दाखविले. त्याशिवाय पनवेल महापालिका आणि सिडको अधिकार्‍यांमधून अग्नी जात नसल्याने त्यांच्या भांडणाचाही गंभीर परिणाम कोविड हॉस्पीटल सुरू होण्यावर झाला आणि उभयतांमध्ये गेले चार महिने पत्रयुद्ध झडत राहिले.

 

या पार्श्‍वभूमिवर पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांना धारेवर धरून लिहिलेल्या कोविड हॉस्पीटलसंदर्भातील पत्रात, आठ दिवसात हॉस्पीटल सुरू न केल्यास सिडको अधिकार्‍यांना पनवेल विधानसभा मतदार संघात फिरू न देण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने सिडको अधिकार्‍यांनी पायाला चक्री बांधून हॉस्पीटल सुरू करण्यासंदर्भातील त्रुटी दूर करण्याचे प्रयास सुरू केले.

 

सिडको भवनातील धायटकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत त्यांनी येत्या 15 दिवसात काम पूर्ण करून महापालिकेकडे कळंबोलीतील कोविड हॉस्पीटल हस्तांतरण करण्याचे कडू यांना लेखी कळविले आहे. पनवेल महापालिकेने हॉस्पीटलच्या अग्निशमन यंत्रणेचा मुद्दा उपिस्थत केल्याने तिथे यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ठेकेदाराला वीस हजार लिटर पाण्याच्या साठ्यासाठी टाक्या बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्या टाक्या अहमदाबाद येथून मागविण्यात आल्या आहेत. येत्या चार ते पाच दिवसात ते काम पूर्णत्वास जाईल. सिडकोने या हॉस्पीटलसाठी 5 कोटी रूपये खर्च केले आहेत. हॉस्पीटल चालविण्याची जबाबदारी पनवेल महापालिकेने स्वीकारली आहे. त्यांनी हस्तांतरण प्रक्रियेनंतर लोकसेवत तातडीने समर्पित करावे, असेही धायटकर यांनी सांगितले.
एकंदर पनवेल संघर्ष समितीच्या कणखर बाण्याने आणि निर्वाणीच्या इशार्‍यानंतर सिडकोची यंत्रणा हादरली असून त्यांनी आता काम पूर्णत्वास नेण्याचे मनावर घेतल्याने महिनाअखेरीस कळंबोलीतील हॉस्पीटल सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे आजच्या बैठकीतून चित्र स्पष्ट झाले.

 

धायटकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सिडकोचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बावस्कर तर संघर्ष समितीच्यावतीने कांतीलाल कडू, सचिन पाटील, हरेश पाटील आणि उदय पंडित आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Tags: covid-19Minister Eknath ShindeMUKTPEEETpanvel muncipal corporationपनवेल महापालिकापालकमंत्री एकनाथ शिंदेमुक्तपीठराजेंद्र धायटकरसंजय मुखर्जी
Previous Post

फडणवीस अडचणीत, सीडीआरवरून अन्वय नाईक कुटुंबाचा संताप, दिशाभूल केल्याचा आरोप

Next Post

ममता बॅनर्जी यांचा हल्ल्याचा आरोप…भाजपाकडून सोशल मीडियावर टर!

Next Post
Mamata v/s Bjp

ममता बॅनर्जी यांचा हल्ल्याचा आरोप...भाजपाकडून सोशल मीडियावर टर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!