मुक्तपीठ टीम
डिज्नी प्लस हॉटस्टारवर एक नवीन पौराणिक शो सुरू होत आहे ज्याचे नाव ‘द लीजेंड ऑफ हनुमान’, असे आहे. त्यामध्ये हनुमान यांचे साहसी कार्य आणि सामान्य वानरापासून ते महान योद्धा होण्यापर्यंतची त्यांची कथा दाखवली जाणार आहे. ही एक अॅनिमेशन सीरिज आहे. याचे कथन अभिनेता शरद केळकर करत आहे.
या सीरिजमध्ये हनुमान महाबली होण्याची कथा रेखांकित केली आहे. हनुमान लहान असताना त्यांची दैवी शक्ती त्यांच्याकडून परत घेतली जाते. त्यांच्यामध्ये असलेल्या देवाला ओळखण्यासाठी त्यांना स्वत: ला शोधावे लागेल. याचदरम्यान, त्यांचा अनेक दुष्ट शक्तींशी सामना होतो, त्यावर हनुमान विजय मिळवतात.
या सीरिजमध्ये कथावाचक म्हणून आपला आवाज देणारे शरद केळकर म्हणाले, “आपल्यापैकी बहुतेक जण हनुमानाची कथा ऐकून मोठे झाले आहेत किंवा त्यांना टेलीव्हिजनवर पाहिले आहे.” विशेष म्हणजे, त्याच्या सुरुवातीच्या काळाबद्दल आपल्याला फारच कमी माहिती आहे. ‘द लीजेंड ऑफ हनुमान’, ही त्यांची सर्वोत्कृष्ट कथा आहे. या सीरिजचा कथाकार म्हणून मी भाग्यवान आहे की, मी या कथेला माझा आवाज देत आहे. ”
ग्राफिक इंडियाचे सह-संस्थापक शरद देवराजन म्हणाले की, पहिल्यांदाच अॅनिमेशनच्या माध्यमातून हनुमानााची पौराणिक कथा तयार केली गेली आहे. त्यात देव, दानव, वन्यजीव, यक्ष आणि अनेक मानव यासारख्या प्रजाती निर्माण केल्या आहेत. तसेच काही मनोरंजक अॅनिमेटेड कार्यक्रम तयार केले गेले आहेत जे आजच्या युगातील प्रेक्षकांसाठी एक नवीन अनुभव असतील.
या सीरिजची निर्मिती ग्राफिक इंडियाने केली आहे. जीवन जे कांग आणि नवीन जॉन यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे, तर शरद देवराजन, सारवत चड्ढा, अश्विन पांडे आणि अरशद सय्यद यांनी याची नोंद केली आहे. ही १३ भागांची वेब सीरिज आहे जी हिंदी, तामिळ, तेलगू, मराठी, बंगाली, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रवाहित केली जाईल. ही मालिका २९ जानेवारी २०२१ रोजी डिज्नी हॉटस्टार व्हीआयपी वर रिलीज होईल.
पाहा व्हिडीओ: