Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लवकरच भारतात खाजगी उपग्रह, शेती आणि उद्योगांसाठी २४ तास रिअल टाइम प्रतिमा

January 5, 2021
in घडलं-बिघडलं
0
pixxel

इस्रो ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था पिक्सेल-इंडिया उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून रिअल टाइम प्रतिमा २४ तास उपलब्ध होऊ शकेल. इस्रो खासगी भारतीय कंपनीचा उपग्रह येत्या ८ महिन्यात प्रथमच अवकाशात पाठवणार आहे. बंगळुरूमधील अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित स्टार्टअप पिक्सेल-इंडियाचा निरीक्षणासाठी असलेला उपग्रह ‘आनंद’ पुढील वर्षी अवकाशात जाईल. इस्रोच्या पीएसएलव्ही सी -५१ रॉकेटने अवकाशात झेपावेल.
‘आनंद’ उपग्रह पृथ्वीवरील कोणत्याही घटनेची रिअल टाइम प्रतिमा २४ तास उपलब्ध करून देईल. पिक्सेलच्या उपग्रहांच्या मदतीने, हंगामात पीक आणि मातीमधील बदलांचे परीक्षण केले जाऊ शकेल. पिक्सेलद्वारे ही माहिती थेट शेतकऱ्यांना दिली जाणार नाही, परंतु इतर कोणतीही कंपनी किंवा एजन्सी पिक्सेलकडून डेटा मिळवून एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना पाठवू शकते.
पिक्सेल इंडिया २०२३ पर्यंत एकूण २४ उपग्रह प्रक्षेपित करेल. सर्व उपग्रह इस्त्रोच्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहांच्या आकार आणि किंमतीपेक्षा १० पट छोटे असतील, परंतु सर्व २४ उपग्रह अवकाशात स्थापित केल्यानंतर, २४ तासांत त्याचे जागतिक कव्हरेज होईल.गुरुवारी पीएसएलव्ही सी -५० रॉकेटमार्फत सीएमएस -१ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे अध्यक्ष डॉ. के शिवन म्हणाले होते की, पीएसएलव्हीची पुढील पीएसएलव्ही सी -५१ मिशन ‘आनंद’ उपग्रह इस्रो आणि भारतासाठी खास असेल. अंतराळ क्षेत्रातील सुधारणांची अंमलबजावणी झाल्यानंतर इस्त्रो सुविधांचा वापर करणार्‍या खासगी क्षेत्राचा हा पहिला उपक्रम असेल.
इस्रो पुढील वर्षी चंद्रयान -३, आदित्य एल -१ लाँच करणार आहे आणि गगनयानला चाचणी उड्डाण देखील पाठवेल. तसेच, जीएसएलव्ही आणि एसएसएलव्हीची मोहीम देखील सुरू ठेवली जाईल. अशाप्रकारे, दरमहा किमान एक किंवा दोन लॉन्चिंग असतील.

Tags: Anand satellitePixel-India satellitepixxelThe Indian Space Research Organizationआनंद उपग्रहपिक्सेल-इंडियाभारतीय अंतराळ संशोधन संस्था
Previous Post

कृष्णाची मूर्ती जगातील सर्वात उंच मूर्ती, एकाच राज्यात राम आणि कृष्णाच्या सर्वात उंच मूर्ती

Next Post

कोणी मारल्या अमिताभ बच्चन यांना हातावर छड्या

Next Post
Amitabh Bachhan

कोणी मारल्या अमिताभ बच्चन यांना हातावर छड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!