Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पहिला नैसर्गिक सॅलड बार पुण्यात, रसायनमुक्त जीवनशैलीसाठी विविध भाज्यांचे सॅलड्स!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
salad bar

मुक्तपीठ टीम

कोरोना संसर्गानंतर लोकांना आरोग्यदायी जीवनशैली जपण्यासाठी आणि समाजाच्या सदृढ आरोग्यासाठी कोथिंबीर कोशिंबीर’ (कोको अँड को) आणि न्यूट्रिअस फार्म यांच्याकडून अवशेषमुक्त भाज्यांची निर्मिती करण्यात आली आहे. कोथरूड परिसरातील वनाजजवळ ‘कोथिंबीर कोशिंबीर’ नावाने ‘विकेंड सॅलड बार’ सुरु करण्यात आला असून, शनिवारी व रविवारी विविध प्रकारचे आरोग्यदायी सॅलड्स येथे उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती ‘कोको अँड को’च्या संस्थापिका, तसेच सस्नेह माईंड अँड बॉडी हीलिंग सेंटरच्या प्रमुख आणि नॅचरोपॅथी तज्ज्ञ डॉ. स्नेहा जोगळेकर यांनी दिली.

 

पुण्यातील या पहिल्याच अनोख्या बारचे उद्घाटन सोमवारी झाले. प्रसंगी न्युट्रियस फार्मचे सहसंस्थापक समीर पोकळे, राहुल म्हसकर, ‘कोको’चे वरुण जोगळेकर, निष्का जोगळेकर, अथर्व मराठे, अतुल पराडकर आदी उपस्थित होते. हा सॅलड बार फक्त विकेंडला उघडा राहणार असून, इतर दिवशी होम डिलिव्हरी दिली जाणार आहे. एक, दोन व्यक्ती किंवा संपूर्ण कुटुंबासाठी ही सॅलड सेवा पुरविली जाणार आहे. तसेच सॅलड थाळी पुणेकरांना चाखता येणार आहे. व्हेज आणि नॉनव्हेज अशा ४०-५० सॅलड्सची मेजवानी मिळेल. आठवड्याचे सबस्क्रिप्शन घेण्याचीही सोय असणार आहे. आरोग्य सर्वोच्च स्थानी ठेवत सामान्य माणसाला परवडेल अशा वाजवी दरात उत्तम प्रतीचे सॅलड्स आणि भाज्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे वरुण जोगळेकर यांनी सांगितले.

 

“अवशेषमुक्त भाज्यांच्या सेवनातून लोकांचे आरोग्य चांगले राहावे, आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारावी आणि शाश्वत निसर्गाची निर्मिती करण्यासाठी आपण सर्वानी एकत्रित प्रयत्न करण्याचा यामागे उद्देश आहे. ‘न्यूट्रिअस’ एक अवशेषमुक्त, हायड्रोफोनिक (पाण्यावरील) आणि मातीविरहित फार्म आहे, जिथे आपण थेट घरी शहरी शेती क्षेत्रात सकारात्मक प्रभाव आणू इच्छितो आणि एक शाश्वत पौष्टिक समुदाय तयार करू इच्छितो जे आपण एक संस्कृती म्हणून पुढच्या पिढीला देऊ शकतो. या भाज्यामधील पोषकता कायम राहते आणि आठवडाभर या भाज्या टिकतात,” असे समीर पोकळे यांनी नमूद केले.

 

डॉ. स्नेहा जोगळेकर म्हणाल्या, “कोरोनानंतर लोकांना थोडे मोकळे वाटावे, त्यांना चांगल्या आरोग्यासाठी प्रेरित करावे यासाठी लवकरच जेएससी एज्युकेशनल ट्रस्टतर्फे कम्युनिटी सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये प्राथमिक पातळीवर ज्येष्ठ नागरिकांना व टप्प्याटप्प्याने सर्वच नागरिकांना या कम्युनिटी सेंटरचा लाभ घेता येणार आहे. या कम्युनिटी सेंटरमध्ये केवळ खेळच नाही, तर वाचन संध्या, ग्रुप व्हीजीटस् बार्बेक्यू, पिकनिक व अन्य उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. प्रत्येकाला या कम्युनिटी सेंटरमध्ये आपला वेळ आनंदाने घालवता यावा, हा उद्देश आहे. अतिशय वाजवी दरात कम्युनिटी सेंटरच्या उपक्रमांत सहभागी होता येणार आहे.”


Tags: 'कोको'चे वरुण जोगळेकरChemical Free LifestyleDr. Sneha Joglekargood newsmuktpeethNatural Salad BarpuneSameer Pokale co-founder of Nutrius FarmVegetable Saladअतुल पराडकरअथर्व मराठेकोथिंबीर कोशिंबीरचांगली बातमीडॉ. स्नेहा जोगळेकरनिष्का जोगळेकरनैसर्गिक सॅलड बारन्युट्रियस फार्मचे सहसंस्थापक समीर पोकळेपुणेभाज्यांचे सॅलड्समुक्तपीठरसायनमुक्त जीवनशैलीराहुल म्हसकर
Previous Post

मोदींचे धोरण, तेच आघाडीचे तोरण, शेतकऱ्यांचे मरण! शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याशी संपादक तुळशीदास भोईटे यांची सरळस्पष्ट चर्चा

Next Post

विमुक्त – भटके विमुक्तांसाठी केंद्राची आर्थिक सक्षमीकरण योजना, विना अडथळा नोंदणीसाठी पोर्टल

Next Post
SEED plan

विमुक्त - भटके विमुक्तांसाठी केंद्राची आर्थिक सक्षमीकरण योजना, विना अडथळा नोंदणीसाठी पोर्टल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!