Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘या’ चित्रपटामुळे महाराष्ट्र-बांग्लादेशातील सांस्कृतिक संबंध होणार दृढ

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचा विश्वास

February 9, 2021
in सरकारी बातम्या
0
amit deshmukh

मुक्तपीठ टीम

 

बांग्लादेशाचे राष्ट्रपिता शेख मुजिबुर रेहमान यांच्या जीवनावर आधारीत ‘बंगाबंधू’ चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे सुरु असून या चित्रपटाच्या निर्मितीमुळे महाराष्ट्र आणि बांग्लादेशमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

 

बांग्लादेशचे माहिती मंत्री डॉ. हसन महमूद यांनी गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट दिली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासह बांग्लादेशचे शिष्टमंडळ उपस्थित होते. या शिष्टमंडळात बांग्लादेशचे खासदार शाल्मुम सरवर कमाल, बांग्लादेशचे भारतातील उप उच्चायुक्त लुत्फर उपस्थित होते. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन.के.व्यास, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा, सह व्यवस्थापकीय संचालक आंचल गोयल यांच्यासह दादासाहेब फाळके चित्रनगरीचे अधिकारी उपस्थित होते.

 

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख म्हणाले की, दादासाहेब फाळके चित्रनगरीत सध्या ‘बंगाबंधू’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून या चित्रपटामध्ये बांग्लादेशचा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यनंतरचा इतिहास दाखविला जाणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन श्याम बेनेगल करीत आहे. विशेष म्हणजे भारत आणि बांग्लादेश यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ हे या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण कोलकाता आणि मुंबई येथे होत असून या चित्रपटामुळे महाराष्ट्र आणि बांग्लादेशमधील सांस्कृतिक संबंध दृढ होण्यास मदत होणार आहे.

 

भारत आणि बांग्लादेश यांची नैसर्गिक मैत्री असून दोन्ही देशांना ऐतिहासिक वारसा आहे. भारत आणि बांग्लादेश दरम्यान उद्योग, सांस्कृतिक आणि वाणिज्यिक चांगले संबंध आहेत. ‘बंगाबंधू’चित्रपटामुळे बांग्लादेशची महाराष्ट्राबरोबरची घनिष्ठता वाढेल असा विश्वास यावेळी डॉ.हसन महूमूद यांनी व्यक्त केला. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या चित्रनगरी येथे कार्यरत असलेल्या एक खिडकी प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आनंदही डॉ. महमूद यांनी यावेळी व्यक्त केला.

 

महाराष्ट्र भेटीसाठी आलेल्या बांग्लादेश शिष्टमंडळाने यावेळी ‘बंगाबंधू’ चित्रपटाचे दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि या चित्रपटाच्या कलाकारांसमवेत संवाद साधला. याशिवाय चित्रनगरी येथे उभारण्यात आलेल्या अद्ययावत मेकअप रुम संकुलाचा शुभारंभ केला तसेच चित्रनगरी येथील मंदिर आणि काही चित्रीकरण स्थळे पाहिली.

 


Tags: bangladeshMaharashtraदादासाहेब फाळके चित्रनगरीबांग्लादेशमंत्री अमित देशमुखमंत्री डॉ. हसन महमूदमहाराष्ट्र
Previous Post

मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या अभियांत्रिकी, वैद्यकीय संस्थेच्या उभारणीसाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा

Next Post

पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून भारताचा दारुण पराभव

Next Post
INDvsENG

पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून भारताचा दारुण पराभव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!