Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्कृष्ट चित्ररथ विजेत्यांचा मुख्य राजशिष्टाचार अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

January 25, 2021
in सरकारी बातम्या
0
republic day

मुक्तपीठ टीम

 

प्रजासत्ताक दिन २०२० मध्ये उत्कृष्ट चित्ररथ सादरीकरण केलेल्या सहा विभागांच्या अधिका-यांचा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा पाटणकर-म्हैसकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन मंत्रालयात गौरव करण्यात आला. यामध्ये पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, गृह आणि पर्यावरण विभाग यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय (विभागून) आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले. राजशिष्टाचार मंत्री यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र यावेळी प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे शासकिय विभागांमार्फत विविध क्षेत्रातील विकास कामांचे व योजनांचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथांचे सादरीकरण करण्यात येते. २६ जानेवारी २०२० रोजी प्रजासत्ताक दिनाचा ७० वा वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विभागाचे एकुण १२ चित्ररथ संचलनात सहभागी झाले होते.

 

सन्मानपत्र प्राप्त अधिका-यांचा आणि त्यांच्या विभागीय कर्मचा-यांचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा पाटणकर-म्हैसकर यांनी अभिनंदन केले. भविष्यातही आपण अशीच कामगिरी करून उत्साहपूर्वक योगदान द्यावे असे सांगून त्यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.

 

Certificate distribution

प्रथम पारितोषिक पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘स्वराज्याचे पहिले सरखेल’ या चित्ररथास घोषित करण्यात आले. विभागाच्यावतीने सहसंचालक मीनल जोगळेकर यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. द्वितीय पारितोषिक उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ‘उच्च तंत्र शिक्षण विभागाची गरुडझेप’ या चित्ररथास घोषित करण्यात आले. विभागाचे अवर सचिव शशिकांत काकडे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ‘चला मुलींनो खेळुया’या चित्ररथास तर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ‘गौरव अण्णाभाऊंच्या कार्याचा, जागर जन्मशताब्दी वर्षाचा’ या दोन चित्ररथास तृतीय पारितोषिक विभागुन देण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव स्वाती नानल, आणि सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, अवर सचिव सिद्धार्थ झाल्टे यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

 

republic day

तर उत्तेजनार्थ गृह विभागाच्या ‘सर सलामत तो पगडी हजार’ या ट्रॅफिकच्या चित्ररथास प्रदान करण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पडवळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्विकारला. पर्यावरण विभागाच्या ‘हवामान बदल: आव्हान व उपाययोजना’ या चित्ररथास उत्तेजनार्थ पोरितोषिक घोषीत करण्यात आले. विभागाच्यावतीने जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी सन्मान स्विकारला. कार्यक्रमावेळी राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव उमेश मदान उपस्थित होते.

 

या चित्ररथांचे गुणांकन करण्यासाठी सर जे.जे.उपयोजित कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता, सर जे.जे. स्कुल ऑफ आर्टचे अधिष्ठाता, आणि नाट्य विभागाचे संचालक यांची समिती गठीत करण्यात आली होती.


Tags: 26 January 2020२६ जानेवारी २०२०ChitrarathJ.J. School of Artrepublic dayshivaji parkचित्ररथजे.जे. स्कुल ऑफ आर्टप्रजासत्ताक दिनशिवाजी पार्क
Previous Post

“तुमचा सात-बारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव!”

Next Post

#अध्यात्म चैतन्य

Next Post
adhyatm

#अध्यात्म चैतन्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!