मुक्तपीठ टीम
ठाणे आणि दिवा दरम्यान डाऊन जलद मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक कायमस्वरूपी चालवण्यासाठी रविवारी “एमआरव्हीसी” ने आयोजिलेला १४ तासांचा मेगा ब्लॉक वेळेवर सुरू झाला आणि सर्व नियोजित कामे तपशीलवार पूर्ण करण्यात आली.
२३ जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर पहाटे १.२० वाजता नियुक्त ‘डीएन थ्रू लाइन’ सुरू करण्यासाठी एमआरव्हीसीचे अभियंता, अधिकारी व अनेक कर्मचारी रात्रभर झटत होते. ठाणे आणि दिवा येथे रेल्वेचे स्लीइंग आणि पार्श्व स्लीइंग कापून ते पुन्हा जोडणे , ठाणे आणि दिवा येथे नवीन मार्गाचा समावेश करणे आणि ट्रॅक टॅम्पिंगनंतर ती सुरू करणे,
ठाणे आणि दिवा येथे गाड्यांना वीजपुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड वायरचे (ओएचई ) वायरिंग, क्रॉस स्प्लिसिंग, प्रोफाइलिंग आणि रिडंडंट वायर काढून टाकणे/काढणे यासह क्रॉसओवर/स्लिव्हड भागावर काम करणे ही महत्वाची कामे करण्यात आली.
शिवाय, ठाणे आणि दिवा येथे आरआरआय पॅनेलमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आणि सध्याच्या गीअर्ससह, नव्याने बसवलेल्या गीअर्सचे इंटरलॉकिंग सुनिश्चित करण्यात आले आहे. जेणेकरून सिग्नलिंग यंत्रणा सुरुवात होईल.
एमआरव्हीसीचे अध्यक्ष/ व्यवस्थापकीय संचालक रवी अग्रवाल, संचालक (प्रकल्प) विजय नाथावत, विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी (एचओडी) आणि एमआरव्हीसीचे इतर अधिकारी व कर्मचारी, मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक (डीआरएम)/ एडीआरएम यांच्यासह त्यांचे अधिकारी/कर्मचारी यांचाही समावेश होता. या सर्वांनी ‘साइट’ वर नियंत्रण आणि विविध खात्यांकडून कामाचे समन्वय साधणे या जबाबदाऱ्या पार पाडल्या.
कामाच्यास्थळी ४ जेसीबी , ४टॉवर वॅगन, एक हॉपर रेक, ३ टँपिंग मशीन आणि अंदाजे ५०० मजूर ठाणे आणि दिवा दरम्यान नियुक्त केलेल्या ‘डाऊन थ्रू’ मार्गावर गुंतले होते. मुंबईकडे येणाऱ्या ‘अप थ्रू’ मार्गावर ५ व्या आणि ६ व्या लाईनवर एमआरव्हीसी आणि मध्य रेल्वेचे अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. आगामी संरेखनासाठी ७२ तासांचा पुढील ब्लॉक ४ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी २२ दरम्यान होणार आहे, असे ‘मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड’चे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी ‘मुक्तपीठ’ ला सांगितले.