Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंग, काश्मिर खोऱ्यातून पुन्हा काश्मिरी पंडितांचं स्थलांतर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kashmiri Pandits

मुक्तपीठ टीम

जम्मू-काश्मिरातील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित शिक्षिकेची हत्या केल्यानंतर स्थानिक हिंदूंमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पाच महिन्यांत टार्गेट किलिंगमध्ये १३ जणांची हत्या करण्यात आली आहे. शिक्षिका रजनी बाला यांच्या हत्येनंतर १०० हून अधिक काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून स्थलांतर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्या तेथे असलेल्यांनीही निघावं लागेल, अशी भीती व्यक्त केली आहे.

दरम्यान, आज सकाळी काश्मिरातील शोपियनमध्ये एका खासगी गाडीत झालेल्या स्फोटात तीन जवान जखमी झाले. ती गाडी भाज्याने घेण्यात आली होती. त्या गाडीतील स्फोट आधी प्लांट केलेल्या स्फोटकांचा, हातबॉम्बचा की सदोष बॅटरीचा ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याचा तपास सुरु आहे.

उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला येथील काश्मिरी पंडित कॉलनीचे अध्यक्ष अवतार कृष्ण भट यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारपासून या भागात राहणाऱ्या ३०० कुटुंबांपैकी जवळपास निम्म्या कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. या हत्येनंतर ते घाबरले होते, एवढेच नाही, आम्हीही उद्यापर्यंत निघून जाऊ, सरकारच्या उत्तराची वाट पाहत आहोत. सरकारने आम्हाला काश्मीरमधून बाहेर जाण्यास सांगितले आहे, असे ते म्हणाले.

श्रीनगर परिसर सील

  • पोलिसांनी श्रीनगरमधील एक भाग सील केला आहे.
  • ज्या भागात काश्मिरी पंडित सरकारी कर्मचारी राहतात त्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे.
  • स्थानिक प्रशासनाने कुटुंबांच्या पलायनासंदर्भात भाष्य केलेले नाही.
  • मात्र, लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी गेल्या महिन्यात काश्मिरी पंडितांना आश्वासन दिले की त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना केल्या जातील.

Tags: Jammu KashmirKashmiri PanditRajni Balaकाश्मिरी पंडितजम्मू-काश्मिररजनी बाला
Previous Post

#मुक्तपीठ #Live “भाजपा महिला नेत्याचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल! कारवाई का नाही?”

Next Post

नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Next Post
नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेल्या विविध प्रकल्प मंजुरीची बैठक 1

नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!