मुक्तपीठ टीम
मुस्लिम तरुणांना दहशतवादी संघटनेत सामील करून घेण्यासाठी त्यांचे ब्रेनवॉश केले जाते. यासाठी अनेक दहशतवादी संघटना वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असतात. आता मात्र या दहशतवादी संघटनांनी धर्माच्या नावाखाली तरुणांची दिशाभूल करण्यासाठी टेलिग्रामवर ग्रुप बनवले असल्याची धक्कादाय माहिती दहशतवादी प्रकरणांची चौकशी करणारी राष्ट्रीय तपास संस्था एनआयएला मिळाली आहे. एनआयएने यासंबंधित ‘ईगल ऑफ खोरासान’ आणि ‘हिंडर ईगल’ नावाच्या दोन टेलिग्राम ग्रुप्सची ओळख पटवली आहे.
तरुणांना प्रशिक्षणासाठी काश्मीर आणि अफगाणिस्तानमध्ये पाठवले जाते…
- या गटांच्या माध्यमातून तरुणांची दिशाभूल केल्यानंतर दहशतवाद्यांना काश्मीर आणि अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले जात होते.
- आतापर्यंत अनेक तरुणांना दहशतवादी प्रशिक्षणासाठी पाठवल्याची बातमी आहे, त्याबाबत एनआयएने तपास सुरू केला आहे.
मुस्लिम तरुणांचा ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न!!
- अख्तर आणि त्याचे साथीदार टेलीग्राम ग्रुपच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क साधत होते, त्यानंतर त्यांनी मुस्लिमांवर अत्याचारासह इतर गोष्टी सांगून त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला.
- ‘ईगल ऑफ खोरासान’ नावाच्या ग्रुपच्या माध्यमातून तरुणांना कट्टरपंथी बनवून दहशतवादी प्रशिक्षणासाठी पाठवले जात होते.
- त्याचवेळी ‘हिंडर ईगल’ नावाच्या ग्रुपच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणांची कारवाई मुस्लिमांवरील अत्याचार म्हणून दाखवण्यात आली.
अख्तर हुसेनवर एनआयएची कारवाई…
- राष्ट्रीय तपास यंत्रणेने अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आरोपी दहशतवादी अख्तर हुसैन याला बंगळुरू येथून अटक केली असून तो मूळचा आसामचा आहे.
- तो दहशतवादी संघटना अल कायदा तसेच अनेक दहशतवादी संघटनांसाठी काम करत असे.
- त्याने टेलिग्राममध्ये ‘ईगल ऑफ खोरासान’ आणि ‘हिंडर ईगल’ असे दोन ग्रुप्स तयार केले होते, ज्याला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे.
- यानंतर गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.