मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली भा ज यु मो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांनी आपल्या टीमची घोषणा केली आहे. समाजातील सर्व घटकांमधील तरुणांना स्थान दिले आहे, असा दावा तिवाना यांनी केला आहे.
टीम तिवानामध्ये कोण?
भा ज यु मो मुंबईच्या नवीन टीम मध्ये पुढील समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
- 6 मराठा,
- 5 ओबीसी,
- 5 उत्तर भारतीय,
- 4 राजपूत,
- 2 ब्राह्मण,
- 2 दक्षिण भारतीय,
- 2 गुजराती,
- 2 SC/ST
- १ सिंधी
- १ मारवाडी
या समाजातील तरुणांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. अशाप्रकारे भा ज यु मो मुंबईच्या या टीमला आतापर्यंतचा सर्वात संतुलित संघ असल्याचे तिवाना यांनी सांगितले.
अर्जुन मेघे, रोहन देसाई, विराज चोडणकर, रितेश सावंत, आशुतोष ठाकर, प्रविण भानुशाली, दीपक सिंह, राहुल गुप्ता आणि आदित्य सिंह यांना तिवानाच्या संघात उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे. कमलेश डोके, मिलिंद वाडेकर आणि संतोष पालेकर यांना सरचिटणीसाची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ.केयूर प्रामाणिक, अजेश हेगडे, राजेंद्र मोरे, एड राजू चव्हाण, प्रद्युम्न सावंत, अविनाश दुलगच, जयकुमार थेवर, नितीन गुप्ता आणि विकेश जैन यांना सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
जुन्या टीममध्ये सोशल मीडिया संयोजकाचे पद भूषवलेल्या वेदांत लालवानी यांना पुन्हा तीच जबाबदारी देण्यात आली आहे. त्याच्यासोबत निहाल स्वरूप आणि प्रणव सिंह ठाकूर यांना सोशल मीडियामध्ये सह-संयोजकाची जबाबदारी देण्यात आली आहे.
श्री तिवाना म्हणाले की, भा ज यु मो संस्थेत प्रत्येक विभाग, भाषा आणि प्रदेशातील तरुणांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. ही टीम पूर्णपणे संतुलित संघ आहे आणि तरुणांच्या हितासाठी काम करेल.