Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“साहेबांचा करारी बाणा…विजेचे खांब हलले आणि वंचितांच्या जीवनात शिक्षणाची ऊर्जा सळसळली!”

निबर नोकरशाहीला हलवणाऱ्या शरद पवारांच्या करारी बाण्याच्या आठवणीला डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा उजाळा

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
sharad pawar vanjari community

डॉ. जितेंद्र आव्हाड / व्हा अभिव्यक्त!

रेल्वे सुरु झाली आणि आमचा वंजारी समाज मोठ्या संख्येने मुंबईत आला. शिक्षण नाही, गावोगाव भटकूनही शेतमजुरीवर पोट भरत नाही. तेव्हा शारीरिक कष्टच करायचे, तर निदान एका जागी स्थिर होऊन ते करावे असा सूज्ञ विचार त्यांनी गेला असावा. मुंबईत आल्यावर कुणी हातगाड्या चालवल्या तर कोणी रेल्वे स्टेशनवर हमाली केली. माझे आजोबा हे त्यापैकीच एक. अनेक वर्ष ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सामानाची ने आण करत होते आणि अनेक वर्ष फलाटावरच राहिले.

 

मुद्दा वेगळा आहे. आपले हे हाल शिक्षण नसल्यामुळे झाले हे या लोकांना कळलं. मुंबईतील पांढरपेशा वर्ग त्यांनी जवळून पाहिला. आपल्याला ज्या यातना सोसाव्या लागल्या त्या आपल्या पुढच्या पिढ्यांना भोगाव्या लागू नयेत म्हणून या कष्टकरी लोकांनी सिन्नरमध्ये शाळा काढायचं ठरवलं. पैसे दोन पैसे आपसात गोळा करून त्यांनी सिन्नरमध्ये काही एकर जागा घेतली. पण आपापल्या आयुष्याचा गाडा ओढण्यात हे लोक इतके व्यग्र होते की शाळेचं घोडं फक्त जमीन घेण्यावरच अडलं. वसंतराव नाईक शिक्षण संस्थेशी संलग्न असलेल्या या प्रस्तावित शाळेची जमीन कित्येक वर्ष ओसाड माळरानासारखी पडून राहिली.

 

काही लोकांनी उत्साह दाखवून शाळेच्या बांधकामाला सुरुवात करायचा प्रयत्न केला तेव्हा दिसलं की दरम्यानच्या काळात जमिनीवर विजेच्या खांबांचं बांधकाम झालंय आणि वरून वीजवाहक तारा गेल्या आहेत. ते हलवणं हे महाकठीण काम होतं. प्रकरण मा. शरद पवार यांच्याकडे गेलं. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलं. जिल्हाधिकाऱ्यांनी खास नोकरशाहीची उडवाउडवी उत्तरं दिली तेव्हा साहेबांनी त्यांच्या खास शैलीत त्यांचा रुबाब उतरवला. मा. दिलीप वळसे-पाटील यांना सूचना देऊन साहेबांनी खांब हलवायला सांगितले. अर्थातच खांब हलवले गेले. पण आर्थिक भरपाई करायचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा हात वर केले आणि शिक्षण संस्थेने हा भार उचलावा अशी भूमिका घेतली.

 

यावेळी साहेबांच्या करारीपणाचा पुनश्च प्रत्यय आला. “मुळात एखाद्या संस्थेच्या जमिनीवर तिला न विचारता दुसरं कुठलं बांधकाम होतं याचा अर्थ तुम्ही काय झोपा काढत होतात? ही कष्टकऱ्यांनी रुपया दोन रुपये काढून अक्षरशः घामाच्या पैशातून घेतलेली जमीन आहे. तुमच्या हलगर्जीपणाची शिक्षा सुद्धा त्यांनीच भोगायची का”, अशी कणखर भूमिका साहेबांनी घेतली.

 

वास्तविक या १४-१५ वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत. हे प्रकरण साहेबांपर्यंत नेण्यात माझा पुढाकार होता हे वेगळ्याने सांगायची गरज नाही किंवा त्यातून माझा ढिंढोरा पिटण्याची सुद्धा माझी इच्छा नाही. पण ते आत्ता सांगायचं कारण एवढंच की आज सिन्नरमध्ये या शाळेच्या बांधकामाला माझ्या हस्ते सुरुवात होत आहे. माझ्या आजोबांनी त्या काळात ही जमीन विकत घ्यायला किती वर्गणी दिली होती हे मला माहीत नाही. ते महत्त्वाचं सुद्धा नाही. महत्वाचं हे आहे की गेली कित्येक दशकं त्या पिढीने पाहिलेलं एक शाळेचं स्वप्न आज साकार होत आहे. त्याचा साक्षीदार मी असेन हेच मला पुरेसं आहे. सामानाची ओझी वाहून, किंवा हातगाड्या ओढून आपले गुडघे आणि खांदे झिजवून मरण पावलेल्या त्या वंजारी समाजाच्या पिढीला आज मी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहीन. अमानवी शारीरिक कष्टातून, दुय्यम दर्जाच्या वागणुकीतून त्यांना स्वातंत्र्य हवं होतं. त्याची एक वीट आज रचली जाईल.

 

वास्तविक, आजच्या समारंभाला पवार साहेब उपस्थित राहणं हे जास्त औचित्यपूर्ण ठरलं असतं. पण ते शक्य झालं नाही. तथापि, या सरस्वतीच्या मंदिराच्या बांधकामाचा मार्ग त्यांनी मोकळा करून दिला याची सिन्नरच्या गोरगरीब जनतेला आणि इथल्या प्रत्येक विटेला आठवण राहील.

(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत. )


Tags: jitendra awhadnashiksharad pawarsinnarvanjari communityजितेंद्र आव्हाडनाशिकवंजारी समाजशरद पवारसिन्नर
Previous Post

६१२५ शब्द…दीड तास…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वातंत्र्यदिनाचं संपूर्ण भाषण जसं आहे तसं!

Next Post

तेजिंदर सिंह तिवानांनी जाहीर केली मुंबई भाजयुमोची नवी टीम

Next Post
Tajinder singh Tiwana BjYM-1

तेजिंदर सिंह तिवानांनी जाहीर केली मुंबई भाजयुमोची नवी टीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!