मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायऊतार व्हावे लागल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले. यानंतरही शिवसेनेत बंडखोरीचे प्रमाण थांबलेले नाही आहे. आता तर शिवसेना खरी कोणाची? धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? याची लढाई निवडणूक आयोगाकडे सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी प्रसिद्ध होत आहे. त्याचा टीझर आज संजय राऊत यांनी ट्वीट केलाय. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे हे शिवेसेनेतील फूट, बंडखोर आमदार आणि भाजपवार टीका करताना दिसत आहे.
२६ आणि २७ जुलैला उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रदर्शित!!
- दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ही खास मुलाखत घेतली आहे.
- साधारण ४५ सेकंदांचा हा टीझर आहे.
- या मुलाखतीत राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या टीझरमध्ये पाहायला मिळतात.
- राऊत यांच्या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी अतिशय संयमाने पण ठामपणे उत्तरे दिलेली आहेत.
- २६ आणि २७ जुलैला उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत प्रदर्शित होणार आहे.
- राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे नेमकी काय उत्तरे देणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
सामना
26 आणि 27 जुलै
उद्धव ठाकरे यांची जोरदार मुलाखत pic.twitter.com/UrzhfDvdx7— Sanjay Raut (@rautsanjay61) July 24, 2022
भाजपाला शिवसेना आणि ठाकरे यांना वेगळे करायचे आहे!!
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या खास मुलाखतीत भाजपावर कडक टीका केलीय.
- प्रसिद्ध करण्यात आलेल्या टीझरमध्ये उद्धव ठाकरे हे त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे आहेत असे म्हणताना दिसत आहेत.
- मुंबईत झालेल्या शिवसेना शाखेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातही उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्देशून केलेल्या भाषणात हे वक्तव्य केलेले आहे.
- भाजपाला शिवसेना आणि ठाकरे यांना वेगळे करायचे आहे.
- मात्र जे शिवसेना आणि ठाकरेंना वेगळे करायला येतील त्यांना पाताळात गाडल्याशिवाय राहणार नाही.
- शिवसेना आणि ठाकरे कधीही वेगळे होऊ शकणार नाही, असा विश्वास त्यांनी शिवसैनिकांना दिला आहे.