मुक्तपीठ टीम
आता सगळीकडे कोरोना महामारीमुळे पगार कपातीच्या बातम्या समोर येत आहेत, परंतु टाटा कंपनीची ही एक चांगली बातमी आहे. कोरोना साथीच्या काळात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस या आयटी कंपनीने सन २०२१-२२ या वर्षात कर्मचार्यांच्या पगारात वाढ केली आहे.
सहा महिन्यांपूर्वीही कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली होती, पगार वाढविण्याची आता ही दुसरी वेळ आहे. तर कर्मचार्यांच्या पगारामध्येही वाढ झाली असून सहा महिन्यांनंतर पुन्हा वेतनात वाढ झाली आहे. शेवटची वेतनवाढ १ ऑक्टोबरपासून झाली किंवा लागू केली गेली. याचा फायदा कंपनीच्या ४.७ लाख कर्मचाऱ्यांना होईल. १ एप्रिलपासून कंपनी ही नवीन वेतनवाढ प्रक्रिया लागू करेल. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा पगार १२ ते १४ टक्क्यांनी वाढेल. यासह कंपनीने आश्वासन दिले आहे की, ते कर्मचाऱ्यांचे प्रमोशनही सुरू ठेवतील.
टीसीएस कंपनीचे म्हणणे असे आहे की, “आम्हाला खात्री करुन द्यायची आहे की, एप्रिल २०२१ पासून सर्व क्षेत्रातील कर्मचार्यांना वेतनवाढ देणार आहोत. आम्ही कंपनीशी संबंधित सर्व लोकांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी कठीण काळात कंपनीला साथ दिली. हे कर्मचार्यांविषयी आमची वचनबद्धता दर्शवते. ”
आयटी क्षेत्रात वाढ दिसून येत आहे, कंपनी आपल्या कर्मचार्यांनाही हा फायदा शेअर करत आहे. या क्षेत्रात वाढती मागणी आणि मोठ्या कंपन्यांशी केलेल्या करारामुळे याचा लाभ मिळत आहे. आयटी कंपनी एक्सेन्चरनेही ऑगस्टपर्यंत आपल्या महसुलात वाढ करण्याची आशा व्यक्त केली आहे. एक्सेंचरने एमडी पोस्ट सोडून इतर कर्मचार्यांना एका आठवड्याच्या मूलभूत पगाराचा बोनस जाहीर केला आहे.आयटी कंपनीतील वाढीमुळे हे क्षेत्र कर्मचार्यांसाठी आणखी चांगले सिद्ध होत आहे.
पाहा व्हिडीओ: