मुक्तपीठ टीम
येत्या काही दिवसात अरबी समुद्रात ताऊते चक्रीवादळ येणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील २४ तासांत त्याचे चक्रीवादळात निर्माण होऊन तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागाला चक्रीवादळाचा धोका असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाले आहे. “१६ तारखेला या चक्रीवादळाचा जोर वाढून महाराष्ट्र आणि कोकण किनाऱ्यावर त्याचा प्रभाव जाणवेल. तिथे मुसळधार पाऊस आणि वादळी वारे पाहायला मिळतील. त्यानंतर ते चक्रीवादळ गुजरात, पाकिस्तान किनाऱ्याजवळ सरकेल.
चक्रीवादळाचा संपूर्ण महाराष्ट्रात कसा होणार परिणाम?
- चक्रीवादळाच्या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर १६ मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
- १४ मे रोजी कोकण, गोवा यांसह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि वादळी वारे पाहायला मिळतील.
- तर काही काही ठिकाणी पाऊस पडेल.
- तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील पावसाची शक्यता असेल.
- १५ मे रोजी कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.
- या चक्रीवादळादरम्यान समुद्र खवळलेला राहील. वाऱ्याचा वेगही प्रचंड असेल.
- मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल.
- घाट विभागात मुसळधार पाऊस पडेल.
- मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल.
- विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
चक्रीवादळाचे परिणाम
- मुंबई, ठाणे, पालघर – कमी पावसाच्या सरी
- कोकण – मुसळधार पाऊस, वादळी वारे
- रायगड – मोठा पाऊस
- मध्य महाराष्ट्र, मराठवाडा- तुरळक पाऊस
- विदर्भ – मुसळधार पाऊस, वादळी वारे
धोक्याचा इशारा
- मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
- समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.