मुक्तपीठ टीम
टाटा मोटर्सने आपल्या टिआगो आणि टिगोर या दोन सीएनजी कार लाँच केल्या आहे. टिआगोची किंमत ६ लाख १० हजार रुपयांपासून सुरू होते तर टिगोरची किंमत ७ लाख ७० हजार रुपयांपासून सुरू होते. टिआगो आयसीएनजीचे चार प्रकार आहेत तर, टिगोर आयसीएनजीचे दोन प्रकार उपलब्ध आहेत.
टाटांच्या टिआगो सीएनजीच्या किंमतीविषयीची माहिती
- टिआगो XE- ६ लाख १० हजार रुपये
- टिआगो XM- ६ लाख ४० हजार रुपये
- टिआगो XT- ६ लाख ७० हजार रुपये
- टिआगो XZ+- ७ लाख ५३ हजार रुपये
टिगोर सीएनजी कारच्या किंमतीविषयीची माहिती
- टिगोर XZ- ७ लाख ७० हजार रुपये
- टिगोर XZ+- ८ लाख ३० हजार रुपये
कार चालवण्याचा उत्तम अनुभव
- टाटा मोटर्सचा दावा आहे की, त्यांच्या सीएनजी कार्स सर्वोत्तम पॉवरसह येतात.
- कंपनीने ते १.२ लीटर रेव्होट्रॉन इंजिनवर विकसित केले आहे.
- हे ७३पीएसची कमाल पॉवर जनरेट करते. दुसरीकडे, टिआगो आयसीएनजी चे ग्राउंड क्लीयरन्स १६८एमएम आहे.
- टिगोर आयसीएनजीचे ग्राउंड क्लीयरन्स १६५एमएम आहे जे उत्तम राइड देते, तसेच डोंगराळ आणि खडबडीत रस्त्यावर उत्तम ड्राईव्हचा अनुभव देते.
गॅस गळती शोधणारे सुरक्षा फिचर
- टाटा मोटर्सने त्यांच्या सीएनजी कारमधील गॅस गळती शोधण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा फिचर जोडले आहे.
- कारमध्ये सीएनजीची गळती झाल्यास, गळती शोधण्याचे तंत्रज्ञान स्वयंचलितपणे वाहन सीएनजीवरून पेट्रोल मोडवर हलवते.
- हे तंत्रज्ञान ड्रायव्हरला गॅस गळतीबद्दल सतर्क करते.
- वाहन तात्काळ बंद करण्यासाठी मायक्रो स्वीच देण्यात आला आहे.
- याशिवाय इंधनाचे झाकण उघडे असल्यास ही कार सुरू होत नाही.
- एवढेच नाही तर कारमध्ये थर्मलशी संबंधित घटना घडल्यास सिलिंडर फुटू नये म्हणून सीएनजी पुरवठा बंद केला जातो. त्याच वेळी, ट्यूबमधील उर्वरित वायू हवेत सोडला जातो.
सीएनजी कार बाजारात आता मारुती, ह्युंडाईची टाटांशी स्पर्धा
सध्या मारुती सुझुकी आणि ह्युंडाई मोटर्सचे भारतीय बाजारपेठेत फॅक्टरी फिटेड सीएनजी कारचे वर्चस्व आहे. आता टाटाच्या सीएनजी कार त्यांच्याशी स्पर्धा करतील. मारुती एस-प्रेसो, सेलिरिओ, वॅगनआर, ईको, अल्टो आणि इर्टिगा या कार्समध्ये फॅक्टरी फिटेड सीएनजी किट ऑफर करण्यात आलेले आहे. तर ह्युंडाई ग्रॅंड आय१० आणि ह्युंडाई ऑरा पर्यायांसह येतात.