मुक्तपीठ टीम
सध्या भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईमुळे इलेक्ट्रिक कारचीही मागणी वाढत आहे. यामुळेच कार कंपन्या इलेक्ट्रिक कारवरही लक्ष केंद्रित करत आहेत. पण एक काळजी असते बॅटरी लवकर संपण्याची. टाटा नेक्सन ही कार मात्र आता अपवाद ठरणार आहे.
देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी, टाटा नेक्सन या त्यांच्या सर्वाधिक विक्री करणाऱ्या कारचे इलेक्ट्रिक व्हेरिएंटही विकत आहे. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे ती सिंगल चार्जवर ३१२ किमीची रेंज देते. १ लाख ४७ हजार रुपयांच्या डाउनपेमेंटनंतर आपण या कारचा एक्सएम इलेक्ट्रिक व्हेरिएंट खरेदी करू शकतो.
या कारची एकूण किंमत १४ लाख ६६ हजार ०६७ रुपये आहे. डाऊन पेमेंट केल्यानंतर पाच वर्षांसाठी एकूण १३ लाख १९ हजार०६७ रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल, ज्यावर ९.८% व्याज दर लागू असेल. पाच वर्षांत एकूण १६,७३,८२० रुपये द्यावे लागतील, त्यातील ३,५४,७५३ रुपये व्याज असेल. यासाठी दरमहा एकूण २७,८९७ रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, जर ईएमआय कमी हवा असेल तर ६ वर्षांसाठी कर्ज देखील घेऊ शकता. त्यावेळी एकूण १७,४९,८८८ रुपये द्यावे लागतील. ज्यात ४,३०,८२१ रुपये व्याज द्यावे लागणार. तर दरमहा २४,३०४ रुपये ईएमआय भरावा लागेल.
या कारच्या फीचर्समध्ये ई-ब्रेक डिस्ट्रिब्यूशनसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम , लहान मुलांच्या सीटसाठी आयएसओफिक्स एंकरेज, चाईल्ड सेफ्टी डोर लॉक मिळतात. या कारमध्ये आपल्याला ३०.२ किलोवॅट क्षमतेची लि-आयन बॅटरी, ७ इंचाची टीएफटी ड्रायव्हर इन्फोर्मेशन डिस्प्ले, रिअर एसी व्हेंट्स, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी देखील मिळेल.
पाहा व्हिडीओ: