मुक्तपीठ टीम
टाटा मोटर्सने एक नवी कार टाटा अविन्याचा ट्रेलर लाँच केला आहे. ही कार टाटाच्या नवीन इलेक्ट्रिक वाहन प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. टाटा मोटर्स २०२५ पर्यंत अविन्याला बाजारात आणणार आहे. ही इलेक्ट्रिक कार ३० मिनिटांच्या चार्जिंगवर ५०० किमीची रेंज देईल. या कारच्या ड्रायव्हर आणि पुढच्या प्रवासी सीट रिव्हॉल्व्हिंग आहेत ज्या ३६० डिग्री फिरतील.
अविन्या म्हणजे इनोव्हेशन
- टाटा मोटर्सचे एमडी शैलेश चंद्र यांनी या कॉन्सेप्ट कारमागील संकल्पना मांडली.
- अविन्या हा संस्कृत भाषेतील शब्द आहे.
- या नावात IN देखील आहे, जी भारताची ओळख आहे.
कारच्या स्टियरिंग व्हीलवर टच पॅनेल
- टाटा अवीन्याचे डिझाईन खूपच फ्युचरिस्टीक आहे.
- जे साधे आणि संक्षिप्त ठेवण्यात आले आहे.
- कारच्या स्टियरिंग व्हीलवर टच पॅनल आहे आणि यावरून कारचे सर्व फीचर्स नियंत्रित केले जातात.
- कारचा डॅशबोर्ड प्रत्यक्षात एक संपूर्ण साउंड बार आहे.
- प्रत्येक प्रवाशाच्या हेडरेस्टवर स्पीकर लावण्यात आले आहेत.
कारची सीट ३६० डिग्री रिव्हॉल्व्हिंग!
- या कारचा ड्रायव्हर आणि पुढची पॅसेंजर सीट रिव्हॉल्व्हिंग आहे आणि ती ३६० डिग्री फिरेल.
- कारमधील लेग स्पेसची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
- कारचे इंटीरियर प्रवाशांना आरामदायी वाटेल अशा पद्धतीने बनवले आहे.
- कारच्या मिडल हॅण्डरेस्टजवळ सुगंध डिफ्यूझरही देण्यात आला आहे.
- कारच्या इंटिरिअरमध्ये कोणत्याही डार्क रंगांचा वापर केलेला नाही.
वेगळा लूक, वेगळा ढंग!
- टाटा अविन्याचा विंडस्क्रीन मोठा आहे.
- हे सनरूफमध्ये अशा प्रकारे विलीन होते की जणू काही तो एकच स्क्रीन आहे.
- त्याचे एलॉय व्हील काही प्रमाणात टाटा कर्वच्या व्हील सारखे आहेत, परंतु त्याच्या फ्लॉवर डिझाइनपेक्षा वेगळे आहेत.
- टाटा अविन्या प्रीमियम हॅचबॅकसारखे दिसते, परंतु MPV प्रमाणेच कार्यक्षमता आहे आणि SUV क्रॉसओवर म्हणून डिझाइन केलेली आहे.
- कारच्या फ्रंट ग्रिलला बोल्ड लूक देण्यात आला आहे जो BMW आणि Audi सारख्या लक्झरी कार्ससारखा आहे.
संपूर्ण कार AI कनेक्टेड!
- टाटा मोटर्सचे लक्ष कारच्या सॉफ्टवेअरवर अधिक आहे.
- ही कार AI मशीन लर्निंगवर आधारित असेल.
- नवीन टाटा अवीन्यामध्ये कनेक्टेड कारचे अनेक फिचर्स असतील.
या कारवर टाटाचा नवा लोगो!
- इलेक्ट्रिक वाहनांसाठी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी ही नवीन कंपनी स्थापन केली आहे.
- टाटा अवीन्या ही कंपनी या कंपनीच्या अंतर्गत बनवण्यात आली आहे. -टाटा अवीन्याला टाटा मोटर्सचा नवीन लोगो देण्यात आला आहे जो प्रत्यक्षात कारचा हेडलॅम्प म्हणून काम करेल.