Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमेरिकन कंपनीला झेपलं नाही ते ‘टाटा’ करून दाखवणार! ‘फोर्ड’चे दोन प्लांट चालवणार!

October 9, 2021
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
tata

मुक्तपीठ टीम

देशातील आघाडीची व्यवसायिक कंपनी टाटा मोटर्सने फोर्ड मोटर्सचे तामिळनाडू आणि गुजरातचे प्लांट खरेदी करण्यासाठी प्राथमिक चर्चा केली आहे. त्यांनी अनेक वर्षांच्या नुकसानीनंतर आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टाटा हे खरेदी करण्याचा विचार करत आहे.

 

जर हा करार पार पडला, तर टाटा मोटर्सने अमेरिकन कार कंपनीसोबत केलेला हा दुसरा मोठा करार असेल. मार्च 2008 मध्ये, भारताच्या टाटा मोटर्स ने जॅगुआर लँड रोव्हरला फोर्ड कडून 2.3 अब्ज डॉलर्स मध्ये विकत घेतले होते.

 

फोर्ड युनिट खरेदी करण्याचा निर्णय का घेण्यात आला असावा?

  • टाटा मोटर्स फोर्डचे तामिळनाडू आणि गुजरात युनिट्स खरेदी करण्याचा निर्णय घेत आहे कारण यामुळे पर्यावरणास अनुकूल वाहनांच्या सतत बदलत्या मानकांची पूर्तता करण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल.
  • टाटा मोटर्सकडे सध्या प्रवासी वाहनांची निर्मिती करणारे तीन कारखाने आहेत, त्यापैकी एक फियाट क्रिसलरसह संयुक्त उद्योग म्हणून कार्यरत आहे.
  • फोर्ड इंडियाचे दोन्ही प्लांट खरेदी करण्याचा करार अजूनही प्राथमिक टप्प्यात आहे.
  • टाटा मोटर्सने आपला देशांतर्गत प्रवासी वाहन व्यवसाय विसर्जित केला आहे आणि त्याचे मूल्य ९ हजार ४२० कोटी आहे.

 

लँड रोव्हर आणि जग्वारला जीवनदान!

  • 2008 मध्ये टाटा मोटर्सने फोर्ड्स लँड रोव्हर आणि जग्वार ब्रँड खरेदी करण्याची ऑफर दिली.
  • त्यावेळी या दोन्ही ब्रॅण्डची विक्री खूप वाईट झाली.
  • अमेरिकन कार कंपनी फोर्डचे प्रचंड नुकसान होत होते.
  • त्यावेळी रतन टाटा हे दोन्ही ब्रँड बंद करू शकले असते, पण रतन टाटांनी तसे केले नाही.
  • उलट लंडन युनिटला पूर्वीप्रमाणे काम करण्याचे स्वातंत्र्य दिले.
  • आज लँड रोव्हर आणि जॅगुआर जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार ब्रँडमध्ये आहेत.

 

टाटा मोटर्सला होणार मोठ्या प्रमाणात लाभ

  • तामिळनाडूमध्ये टाटा मोटर्सची कोणतीही उत्पादन सुविधा नाही.
  • त्यांचे गुजरातमध्ये एक प्लांट आहे. हे फोर्डच्या उत्पादन युनिटच्या अगदी जवळ आहे.
  • तामिळनाडू सरकारला फोर्डच्या उत्पादन युनिटसाठी मालक शोधण्यात स्वारस्य आहे जेणेकरून ते राज्यातील लोकांना कामावर घेण्याचा निर्णय जलदगतीने करू शकेल.
  • अमेरिकेतील आघाडीची कार कंपनी फोर्ड मोटर्सने भारतातील दोन्ही उत्पादन युनिट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags: fordgujratmuktpeethratan tataTamil NaduTata Motorsजॅगुआर कारटाटा मोटर्सफोर्डमुक्तपीठरतन टाटा
Previous Post

राज्यात २,६२० नवे रुग्ण, २,९४३ रुग्ण बरे! मुंबईत पुन्हा पाचशेवर रुग्ण!!

Next Post

पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंचा लिलाव, ऑलिंपिकवीर निरज चोप्राच्या भाल्याला सर्वाधिक किंमत!

Next Post
neeraj

पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंचा लिलाव, ऑलिंपिकवीर निरज चोप्राच्या भाल्याला सर्वाधिक किंमत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!