Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिंगल चार्जमध्ये चांगली रेंज देतात टाटा-महिंद्रांच्या ‘मेड इन इंडिया’ ईलेक्ट्रिक कार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Tata-Mahindra

मुक्तपीठ टीम

सध्या इंधनाचे वाढते दर आणि वाढत्या पर्यावरण जागरुकतेमुळे लोकांचा कल हा इलेक्ट्रिक कार्सकडे वाढताना दिसत आहे. त्यातच आता भारतातील कारप्रेमींच्या मनात विश्वसनीय ब्रँड असणाऱ्या टाटा मोटर्स आणि महिद्रा यांनीही ईव्ही कार बाजारात आणल्या आहेत. सिंगल चार्जमध्ये चांगली रेंज देणाऱ्या त्यांच्या कार चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

 

टाटाच्या टिगोर ईव्ही, एकदा चार्ज, ३०६ किमीचा पल्ला!

  • इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये देशातील सर्वात स्वस्त कारच्या यादीत टाटा टिगोर पहिल्या क्रमांकावर आहे.
  • टिगोर ईव्ही ही कंपनीच्या झिपट्रोन ईव्ही तंत्रज्ञानासह येते.
  • एका चार्जवर तुम्ही ही कार ३०६ किलोमीटरपर्यंत चालवू शकता असा कंपनीचा दावा आहे.
  • ईव्ही कारना रेग्युलर चार्जरवर ० ते ८० टक्के जाण्यासाठी सुमारे ८ तास ४५ मिनिटे लागतात.
  • दुसरीकडे, टिगोर ईव्ही डीसी फास्ट चार्जरने अवघ्या ६५ मिनिटांत चार्ज होऊ शकते.
  • या कारची किंमत जवळपास १२ लाख रूपये आहे.

 

ईलेक्ट्रिक कार टाटा नेक्सनविषयी सविस्तर माहिती

  • टाटा नेक्सन ईव्हीला कंपनीच्या झिपट्रोन तंत्रज्ञानाद्वारे हाय-व्हॉल्टेज पॉवरट्रेन देखील मिळते.
  • या कारमध्ये डीसी मोटरचा वापर करण्यात आला आहे.
  • पॉवरच्या बाबतीत, त्याचे इंजिन १२९ पीएस पॉवर आणि २४५ एनएम पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे.
  • नेक्सन ईव्ही १० सेकंदांपेक्षा कमी वेळेत ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवू शकते.
  • या कारमध्ये एका चार्जमध्ये ३१२ किमीची रेंज देण्याची क्षमता आहे.
  • याची किंमत १३ लाख ९९ हजार रुपये आहे.

 

ईलेक्ट्रिक कार महिंद्रा ई-व्हेरिटोचे खास फिचर्स

  • ईलेक्ट्रिक कार महिंद्रा ई-व्हेरिटो ही महिंद्रा अॅंड महिंद्राची एकमेव इलेक्ट्रिक कार आहे, जी महिंद्राकडे सध्या विक्रीसाठी आहे.
  • ही कार एका चार्जवर १८१ किमीची रेंज ऑफर करते.
  • यामध्ये कंपनीने २८८ एएच बॅटरी पॅक वापरला आहे. जे नियमित चार्जरच्या मदतीने ११ तास ३५ मिनिटांत चार्ज करता येते.
  • डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने ते केवळ १ तास ३० मिनिटांत चार्ज करता येते.
  • या कारची किंमत १० लाख १५ हजार रूपये आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: electric cargood newsgood rangeLatest Techmade in indiaMahindra E-Veritomuktpeethsingle chargetata nexonTata TigorTata-Mahindraईलेक्ट्रिक कारईलेक्ट्रिक वाहनेचांगली रेंजचांगल्या बातम्याटाटा टिगोरटाटा नेक्सनटाटा-महिंद्रामहिंद्रा ई-व्हेरिटोमुक्तपीठमेड इन इंडियालेटेस्ट टेकसिंगल चार्ज
Previous Post

भारतातून ‘रेडी टू इट’ खाद्य उत्पादन निर्यातीत १२ टक्के वाढ! आता ३९४ दशलक्ष डॉलर्सवर!

Next Post

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या एमबीबीएस, एमडी अभ्यासक्रम प्रवेशक्षमतेत वाढ

Next Post
Medical College

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या एमबीबीएस, एमडी अभ्यासक्रम प्रवेशक्षमतेत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!