मुक्तपीठ टीम
सध्या इंधनाचे वाढते दर आणि वाढत्या पर्यावरण जागरुकतेमुळे लोकांचा कल हा इलेक्ट्रिक कार्सकडे वाढताना दिसत आहे. त्यातच आता भारतातील कारप्रेमींच्या मनात विश्वसनीय ब्रँड असणाऱ्या टाटा मोटर्स आणि महिद्रा यांनीही ईव्ही कार बाजारात आणल्या आहेत. सिंगल चार्जमध्ये चांगली रेंज देणाऱ्या त्यांच्या कार चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
टाटाच्या टिगोर ईव्ही, एकदा चार्ज, ३०६ किमीचा पल्ला!
- इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये देशातील सर्वात स्वस्त कारच्या यादीत टाटा टिगोर पहिल्या क्रमांकावर आहे.
- टिगोर ईव्ही ही कंपनीच्या झिपट्रोन ईव्ही तंत्रज्ञानासह येते.
- एका चार्जवर तुम्ही ही कार ३०६ किलोमीटरपर्यंत चालवू शकता असा कंपनीचा दावा आहे.
- ईव्ही कारना रेग्युलर चार्जरवर ० ते ८० टक्के जाण्यासाठी सुमारे ८ तास ४५ मिनिटे लागतात.
- दुसरीकडे, टिगोर ईव्ही डीसी फास्ट चार्जरने अवघ्या ६५ मिनिटांत चार्ज होऊ शकते.
- या कारची किंमत जवळपास १२ लाख रूपये आहे.
ईलेक्ट्रिक कार टाटा नेक्सनविषयी सविस्तर माहिती
- टाटा नेक्सन ईव्हीला कंपनीच्या झिपट्रोन तंत्रज्ञानाद्वारे हाय-व्हॉल्टेज पॉवरट्रेन देखील मिळते.
- या कारमध्ये डीसी मोटरचा वापर करण्यात आला आहे.
- पॉवरच्या बाबतीत, त्याचे इंजिन १२९ पीएस पॉवर आणि २४५ एनएम पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे.
- नेक्सन ईव्ही १० सेकंदांपेक्षा कमी वेळेत ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवू शकते.
- या कारमध्ये एका चार्जमध्ये ३१२ किमीची रेंज देण्याची क्षमता आहे.
- याची किंमत १३ लाख ९९ हजार रुपये आहे.
ईलेक्ट्रिक कार महिंद्रा ई-व्हेरिटोचे खास फिचर्स
- ईलेक्ट्रिक कार महिंद्रा ई-व्हेरिटो ही महिंद्रा अॅंड महिंद्राची एकमेव इलेक्ट्रिक कार आहे, जी महिंद्राकडे सध्या विक्रीसाठी आहे.
- ही कार एका चार्जवर १८१ किमीची रेंज ऑफर करते.
- यामध्ये कंपनीने २८८ एएच बॅटरी पॅक वापरला आहे. जे नियमित चार्जरच्या मदतीने ११ तास ३५ मिनिटांत चार्ज करता येते.
- डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने ते केवळ १ तास ३० मिनिटांत चार्ज करता येते.
- या कारची किंमत १० लाख १५ हजार रूपये आहे.