Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पालघरच्या गावातील तरुणीची राष्ट्रीय झेप, अहमदाबादची फुटबॉल स्पर्धा तन्वी पाटील गाजवणार!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, प्रेरणा
0
Tanvi Patil

गौरव पाटील / पालघर

गावात जन्माला येणं म्हणजे प्रगतीच्या वाटा बंद झाल्या असं नसतं. अनेकदा उलट प्रामाणिक प्रयत्न, परिश्रम आणि प्रतिभेच्या बळावर ही ग्रामीण मुलं अधिकच उंच झेप घेतात. आता पालघरच्या निहे या गावातील तन्वी पाटील या फुटबॉल खेळाडूचंच पाहा ना.

 Tanvi Patil

  • पालघरची ग्रामीण खेळाडू तन्वी पाटील राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार असल्याची.
  • पालघर जिल्ह्याच्या पूर्वेला असलेल्या ग्रामीण भागातील निहे या गावात तन्वी अरुण पाटील राहते.
  • तिला फुटबॉल खेळण्याची आवड आहे.
  • तिची गुजरात मधील अहमदाबाद येथे होणाऱ्या महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
  • तन्वी महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा खेळणारी पालघर जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे .
  • तन्वीने कॉलेज जीवनात एन.सी.सी. मध्ये सहभाग घेऊन २०१८साली दिल्लीमध्ये झालेल्या थलसेना शिबिरामध्ये देखील महाराष्ट्राच प्रतिनिधित्व केलं होतं . आता पुन्हा तनवी ला गुजरात मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
  • गुजरात मधील अहमदाबाद येथे २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
  • या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला फुटबॉल संघात तन्वी पाटील प्रतिनिधित्व करणार आहे .
  • जिद्द, मेहनत , चिकाटी आणि महत्त्वाची जोरावर तन्वी ने आपला ध्येय गाठलंय, असं मितेश पटेल म्हणतात.

 Tanvi Patil Tanvi Patil

तन्वी पाटील ही केवळ ग्रामीण भागातील नसून एका सामान्य कामगार कुटुंबातील आहे. तिचे वडील बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात एका कारखान्यात कामगार आहेत. तिची आई गृहिणी आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असताना देखील तन्वीने जिद्द , मेहनत , महत्वकांक्षा यांच्या जोरावर महाराष्ट्राच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळणाऱ्या महिला फुटबॉल संघात आपलं नाव निश्चित केलंय . पालघरच्या सोनपंत दांडेकर या महाविद्यालयात तन्वीच शिक्षण पूर्ण झालं असेल मागील चार वर्षांपासून तन्वी बोईसर मधील पीडीटीएस या मैदानात फुटबॉलचा सराव करते . तिला या मेहनतीचं फळ मिळालंय . त्यामुळे ग्रामीण भागातील जास्तीत जास्त तरुण तरुणींनी फुटबॉल खेळाकडे वळून महाराष्ट्राचा झेंडा अधिक उंच फडकवावा अशी अपेक्षा तन्वीनं व्यक्त केली आहे .

जर मनाशी निर्धार केला आणि ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिक परिश्रम घेतले तर अशक्य काही नसतं. तन्वी पाटीलच्या उदाहरणातून हेच दिसून येतंय.

पाहा व्हिडीओ:


Tags: Ahmedabad Football TournamentFootball National Tournamentgood newsmuktpeethNational LeapPalgharTanvi Patilअहमदाबाद फुटबॉल स्पर्धाघडलं-बिघडलंचांगली बातमीतन्वी पाटीलपालघरफुटबॉल राष्ट्रीय स्पर्धामुक्तपीठराष्ट्रीय झेप
Previous Post

मुंबईच्या आरे दुग्ध वसाहतीत लम्पी संसर्ग! दहा किमीपर्यंत बाधित क्षेत्र घोषित!!

Next Post

गट्स आणि ग्लोरी सन्मान संध्येत क्रिकेटच्या किश्शांची आतषबाजी, दगडानं नारळफोडीपासून गोलंदाजीपर्यंत!

Next Post
Guts and Glory Honors

गट्स आणि ग्लोरी सन्मान संध्येत क्रिकेटच्या किश्शांची आतषबाजी, दगडानं नारळफोडीपासून गोलंदाजीपर्यंत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!