गौरव पाटील / पालघर
गावात जन्माला येणं म्हणजे प्रगतीच्या वाटा बंद झाल्या असं नसतं. अनेकदा उलट प्रामाणिक प्रयत्न, परिश्रम आणि प्रतिभेच्या बळावर ही ग्रामीण मुलं अधिकच उंच झेप घेतात. आता पालघरच्या निहे या गावातील तन्वी पाटील या फुटबॉल खेळाडूचंच पाहा ना.
- पालघरची ग्रामीण खेळाडू तन्वी पाटील राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार असल्याची.
- पालघर जिल्ह्याच्या पूर्वेला असलेल्या ग्रामीण भागातील निहे या गावात तन्वी अरुण पाटील राहते.
- तिला फुटबॉल खेळण्याची आवड आहे.
- तिची गुजरात मधील अहमदाबाद येथे होणाऱ्या महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
- तन्वी महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा खेळणारी पालघर जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे .
- तन्वीने कॉलेज जीवनात एन.सी.सी. मध्ये सहभाग घेऊन २०१८साली दिल्लीमध्ये झालेल्या थलसेना शिबिरामध्ये देखील महाराष्ट्राच प्रतिनिधित्व केलं होतं . आता पुन्हा तनवी ला गुजरात मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
- गुजरात मधील अहमदाबाद येथे २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
- या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला फुटबॉल संघात तन्वी पाटील प्रतिनिधित्व करणार आहे .
- जिद्द, मेहनत , चिकाटी आणि महत्त्वाची जोरावर तन्वी ने आपला ध्येय गाठलंय, असं मितेश पटेल म्हणतात.
तन्वी पाटील ही केवळ ग्रामीण भागातील नसून एका सामान्य कामगार कुटुंबातील आहे. तिचे वडील बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात एका कारखान्यात कामगार आहेत. तिची आई गृहिणी आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असताना देखील तन्वीने जिद्द , मेहनत , महत्वकांक्षा यांच्या जोरावर महाराष्ट्राच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळणाऱ्या महिला फुटबॉल संघात आपलं नाव निश्चित केलंय . पालघरच्या सोनपंत दांडेकर या महाविद्यालयात तन्वीच शिक्षण पूर्ण झालं असेल मागील चार वर्षांपासून तन्वी बोईसर मधील पीडीटीएस या मैदानात फुटबॉलचा सराव करते . तिला या मेहनतीचं फळ मिळालंय . त्यामुळे ग्रामीण भागातील जास्तीत जास्त तरुण तरुणींनी फुटबॉल खेळाकडे वळून महाराष्ट्राचा झेंडा अधिक उंच फडकवावा अशी अपेक्षा तन्वीनं व्यक्त केली आहे .
जर मनाशी निर्धार केला आणि ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिक परिश्रम घेतले तर अशक्य काही नसतं. तन्वी पाटीलच्या उदाहरणातून हेच दिसून येतंय.