मुक्तपीठ टीम
बॉलीवूडमधील सुपरहिट राहिलेला सिनेमा तानाजी आता मराठीतही येत आहे. या लोकप्रिय झालेल्या सिनेमात अभिनेता अजय देवगण याने तानाजी मालुसरे यांची मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका शरद केळकर याने साकारली आहे तर, तानाजी यांची पत्नी सावित्री मालुसरे यांची भूमिका काजोल हिने साकारली आहे. मराठा वॉरीयर्स म्हणजेच मराठा शूरवीरांची यामध्ये कहाणी सांगितली आहे. लोकांनी या सिनेमाला उत्तम प्रतिसाद दिला आहे त्याचबरोबर अभिनेत्यांनी यातील भूमिका साकरण्यासाठी अपार कष्ट आणि मेहनत घेतलेली आहे.
या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण याने केलेली असून, आता प्रेक्षकांसाठी हा चित्रपट मराठी भाषेतही झळकणार आहे. तानाजी मालुसरे यांचं इतिहासात मोठं नाव आहे. त्यांनी कसलीही पर्वा न करता कोंढाणा किल्ला सर केला यामुळे त्यांची ओळख निर्माण झाली.
हा चित्रपट मराठी भाषेत स्टार प्रवाहवर झळकणार आहे त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही एक अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. २३ एप्रिलला दुपारी १२ वाजता हा सिनेमा स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळेल.
मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा हा चित्रपट आता मराठी भाषेतही पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा जेव्हा मराठी भाषेत आला तेव्हा यावर अभिनेता अजय देवगण म्हणाला की, “एका शूर मराठा योद्ध्याची ही कथा हिंदी भाषेसह त्याच्या मातृभाषेत प्रेक्षकांसोबत शेअर करणे हे मी माझे भाग्यच समजतो. ज्या पद्धतीने संपूर्ण देशासमोर इतिहासाची पाने उलगडणार आहेत, याची अनुभूती महाराष्ट्राने घ्यावी असे मला वाटते.” असे तो म्हणाला.
व्हीएफएक्स शैलीसह तसेच अजय-अतुल यांची धडाकेबाज गाण्यी, अभिनेत्यांच्या जबरदस्त अभिनय त्याचबरोबर मराठी भाषा हे सर्व प्रेक्षकांना घर बसल्या पाहायला मिळणार आहे.