Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रदर्शित होताच ‘तांडव’ वादाच्या भोवऱ्यात, वेबसीरीज बंद करण्याची मागणी

January 17, 2021
in मस्तच
0
thandav

मुक्तपीठ टीम

 

कोरोना संक्रमणाचा प्रभाव बॉलिवूड चित्रपटसृष्टीवरही पडला होता. मात्र, आता हळुहळु सगळ स्थिरावत असताना चित्रपटसृष्टीलाही चालना मिळत आहे. तसेच चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे पसंत केल जात नसल्याने आता ऑनलाइनच चित्रपट आणि वेबसीरीज पाहण्यास सुरूवात झाली आहे. त्यात आता बहुचर्चित ‘तांडव’ वेबसीरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. परंतु ही वेबसीरीज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली. ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या या वेबसीरीजला सध्या सोशल मिडियावर बरेच ट्रोल केले जात आहे. हिंदूंच्या देवतांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप या वेबसीरीजवर केला जात आहे. हा संपूर्ण प्रकार सीरीजमधील एका सीनमुळे घडला आहे. या सीनमध्ये बॉलिवूड अभिनेता मोहम्मद जीशान अयूब स्टेडवर भगवान शंकरांची भूमिका करत आहेत. अशावेळी आणखी एक व्यक्ती स्टेजवर येते. त्यानंतरचं सगळे स्किट हे जेएनयू शी जोडले गेले आहे.

 

याचदरम्यान भगवान शंकरांची भूमिका करत असलेला अभिनेता जीशान अयूब शिवी देतो. त्यामुळे या सीरिजवर चारही बाजूंनी टीकेची झोड उठवली जात आहे. या व्हिडिओवरून चाहत्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. हिंदू संघटना देखील या व्हिडिओमुळे नाराज आहेत.

 

या वेबसीरीजमध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया, तिग्मांशु धूलिया, सुनिल ग्रोवर यांसारखी बडी स्टारकास्ट आहे. ही वेबसीरीज ॲमेझॉन प्राईम वर रिलीज करण्यात आली आहे. रिलीज होताच अनेकांनी या वेबसीरीजवर आपले मत व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. काहींना ही वेबसीरीज पसंतीस उतरली तर काहींना यावर तीव्र रोष व्यक्त केला. हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप ठेवत, रविवारपासून ट्विटरवर तांडव बॉयकट, तांडवा सिरिजचे प्रदर्शन बंद करा अशी मागणी केली जात आहे.

 

तसेच ट्विटरवर #BanTandavNow ट्रेंड सुरु झाला आहे. तांडव सीरिज अभिनेता जीशन अयबूसह निर्मात्याला ट्विटरवर बरचं ट्रोल केले जात असून निर्मात्याने माफी मागावी अशी मागणी हिंदू संघटना करत आहेत. बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील लोकं जाणूनबुजून हिंदू देवता हिंदू संस्कृतीला लक्ष करतात असे युझर्सचे मत आहे. या वेबसीरीजवर हिंदू देवतांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाचे वकील आशुतोष दुबे यांनी ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि अली अब्बास जफर यांनी अधिकृत नोटीस पाठवली आहे.


Tags: amazone IndiaDimple KapadiaSaif Ali KhanSunil GrovertandavTigmanshu Dhuliaweb seriesडिंपल कपाडियातांडवतिग्मांशु धूलियासुनिल ग्रोवरसैफ अली खान
Previous Post

तुमच्या पॅन कार्ड आणि यूआयडीएआयवरुन तर नाही ना घेतले जात आहे बनावट बँक लोन?

Next Post

‘या’ कोरोना योद्ध्यांना मिळाला पहिली लस घेण्याचा मान

Next Post
vaccination

'या' कोरोना योद्ध्यांना मिळाला पहिली लस घेण्याचा मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!