मुक्तपीठ टीम
शारीरिकरित्या कमतरता असणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारे आपण परिपूर्ण व्हावे असे वाटत असते. उच्चार क्षमता नसणाऱ्या व्यक्तींसाठी आता परिपुर्ण होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तंत्रज्ञानाचे हे पुढचे पाऊल सर्वांना आश्चर्यचकित करणारे आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) जोधपूर आणि ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) जोधपूर या दोन संस्थानी बोलणाऱ्या हातमोज्यांचे संशोधन केले आहे. बोलता न येणाऱ्या मुक्या दिव्यांगांसाठी हे हातमोजे संवाद साधण्याचा उत्तम मार्ग ठरू शकतात.
- मुक्या दिव्यांगांसाठी कमी किमतीचे ‘बोलणारे हातमोजे’ विकसित करण्यात आले आहेत.
- हे ग्लोब आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) च्या तत्त्वांवर आधारित आहेत.
- आपोआप भाषा उच्चार तयार करण्यासाठी कार्यरत असतील.
- या उपकरणामुळे मूक व्यक्ती आणि सामान्य व्यक्ती यांच्यात संवाद साधण्याची सोय होईल.
- IIT जोधपूर आणि AIIMS जोधपूर कडून पेटंट मिळालेले हे नवोपक्रम या क्षेत्रात चालू असलेल्या कामाच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे.
हातमोजे व्यक्तींना हाताचे जेश्चर मजकूरात किंवा पूर्व-रेकॉर्ड केलेल्या आवाजात रूपांतरित करण्यात मदत करू शकते. सांकेतिक भाषा ही अशा लोकांसाठी संवाद साधण्याचा एक मार्ग आहे. जे बोलण्याच्या नैसर्गिक क्षमतेपासुन वंचित आहेत किंवा जे आजारपण किंवा दुखापत झाल्यामुळे बोलू शकत नाहीत, त्यांसाठी या उपकरणाच्या माध्यमातून इतरांप्रमाणे संवाद साधने शक्य आहे.
या उपकरणाचा टिकाऊपणा, वजन, प्रतिसाद आणि वापर सुलभता यासारख्या वैशिष्ट्यांमध्ये वाढ करण्यासाठी आयआयटी टीम आणखी काम करत आहे. विकसित उत्पादनाची विक्री आयआयटी जोधपूरच्या स्टार्टअपद्वारे केली जाईल.
बोलणाऱ्या हातमोज्यांचे कार्य
- या उपकरणातील इलेक्ट्रिकल सिग्नल सेन्सर्सच्या पहिल्या संचाद्वारे तयार केले जातात.
- हे उपकरण वापरकर्त्याच्या हाताच्या अंगठ्यावर, बोटावर आणि/किंवा मनगटावर घातले जाते.
- हे विद्युत संकेत बोटांच्या, अंगठ्याच्या, हाताच्या आणि मनगटाच्या हालचालींच्या संयोगाने तयार होतात.
- त्याचप्रमाणे दुसरीकडे सेन्सरच्या दुसर्या संचामधून विद्युत सिग्नल तयार केले जातात.
- हे चिन्हांच्या या संयोजनांचे वाक्य आणि शब्दांच्या संबंधित ध्वन्यात्मकतेमध्ये भाषांतर करते.
- सिग्नल्सची निर्मिती मुक व्यक्तींना इतरांशी संवाद साधण्यास सक्षम करते.