Tag: ट्रान्समिशन आणि वितरण विभाग

एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या पॉवर ट्रान्समिशन आणि वितरण विभागाला जगभरातून कंत्राटे

मुक्तपीठ टीम एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या पॉवर ट्रान्समिशन आणि वितरण व्यवसाय विभागाला भारत आणि परदेशातून विविध ईपीसी कंत्राटे मिळाली आहेत. व्यवसायाच्या रिन्यूएबल विभागाला ओमकारेश्वर धरण जलाशयापाशी ९० मेगावॉट सोलर पीव्ही प्लँट स्थापन करण्यासाठी ईपीसी कंत्राट मिळाले आहे. हा जलाशय मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात वसलेला असून जवळपास वर्षभर त्यातील पाण्याची पातळी बदलत नाही. हा जलाशय जगातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर उद्यानापैकी एक म्हणून उदयास येत आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशामध्ये सुधारित सुधारणांशी जोडलेलेल्या वितरण योजनेअंतर्गत वितरण पायाभूत सुविधांच्या विकासाचे काम हाती घेतले जाणार आहे. या नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्नशील पॅकेजमध्ये जिओस्पॅशियल इन्फर्मेशन सिस्टीम (जीआयएस) वापरून असेट मॅपिंग केले जाणार आहे. परदेशी बाजारपेठांपैकी दक्षिण आफ्रिकेत कंपनीने ४००kV आणि २२५kV ट्रान्समिशन लाइन्सची स्थापना केली आहे. त्याशिवाय कंपनीने सारावाक, मलेशियाच्या बिनतुलु या समुद्रकिनारी वसलेल्या शहरात १३२ kV चे सबस्टेशन उभारण्याचे कंत्राटही जिंकले आहे. पार्श्वभूमी: लार्सन अँड टुब्रो ही भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी असून ईपीसी प्रकल्प, उच्च तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवा क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी जगभरातील ५० देशांत कार्यरत आहे. दमदार, ग्राहक केंद्रीत दृष्टीकोन आणि उच्च दर्जाचा सातत्यपूर्ण ध्यास यांमुळे एल अँड टी गेल्या आठ दशकांपासून प्रमुख व्यवसायांमध्ये आघाडीचे स्थान टिकवून आहे. प्रकल्प वर्गवारी वर्गवारी सिग्नीफिकंट लार्ज मेजर मेगा मूल्य कोटी रुपयांत 1,000 ते 2,500 2,500 ते 5,000 5,000 ते 7,000 >7,000 ...

Read more

ताज्या बातम्या

error: Content is protected !!