Tag: अन्न व औषध प्रशासन

“सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देताना ग्राहकांची फसवणूक नको!”

मुक्तपीठ टीम सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देत असतांनाच ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली जावी यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सहकार्य केले जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पशु संवर्धन व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार उपस्थित होते. महा ऑर्गनिक ॲण्ड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) महाराष्ट्र राज्य  पुणे यांच्या समवेत सेंद्रिय अणि विषमुक्त  शेतीविषयक अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबधित विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पदुमचे प्रधान सचिव जे.पी गुप्ता, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव विजय सौरभ,आयुक्त डॉ. परिमल सिंग याच्यासह पदुम आयुक्त, कृषि आयुक्त, सहकार आयुक्त, एफ. एस. एस. ए. आय. च्या संचालक श्रीमती प्रिती चौधरी, मोर्फाचे अध्यक्ष अंकुश पडवळ, उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे, सचिव प्रल्हाद वरे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. डॉ. शिंगणे पुढे म्हणाले, बाजारात अनेक अन्न पदार्थ सेंद्रिय पदार्थ म्हणून विकले जातात मात्र ज्याच्या वेष्टनावर सेंद्रिय अन्नपदार्थ लिहिले असते  त्यात तसे पदार्थ आहेत अथवा नाही याची खात्री नसते, त्यामुळे या पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी अन्न सुरक्षा व मानदे नियमन तयार केले आहे. यात जे अन्न पदार्थ सेंद्रिय अन्नपदार्थ म्हणून पॅक करुन विक्री केली जाते त्या प्रत्येक पदार्थाला NPOP सर्टिफिकेशन यंत्रणेचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.  तसेच यावर 'जैविक भारत' चा लोगो स्पष्टपणे छापलेला असावा, असे नियम आहेत. सदर नियमांची अन्न व औषध प्रशासना (FDA) मार्फत काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. वेळोवेळी विशेष मोहिमा राबवून नकली सेंद्रीय उत्पादनावर कारवाई केली जाईल. जनतेला अधिकृत सेंद्रिय उत्पादने मिळणेबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असेही त्यांनी सांगितले. राज्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक – कृषिमंत्री दादाजी भुसे सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक असून देशात सेंद्रिय उत्पादनात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. ...

Read more

“शीतपेय थंड करण्यासाठी शुध्द पाण्यापासून बनविलेला बर्फ आवश्यक!”

मुक्तपीठ टीम अन्न व औषध प्रशासनामार्फत सध्या बर्फ, आईस गोळा, ज्यूस, शीतपेय इत्यादींचे नमुने घेण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. भेसळयुक्त ...

Read more

सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेत त्रुटी, श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यास उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश

मुक्तपीठ टीम सार्वजनिक औषध चाचणी प्रयोगशाळांना अन्न व औषध प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांच्याकडे चाचणीसाठी प्राप्त होणाऱ्या सर्व ...

Read more

अन्न व औषध प्रशासनच्या कारवाईत कमी दर्जाच्या फुड सप्लिमेंटचा साठा जप्त

मुक्तपीठ टीम अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत अन्न सुरक्षा कायद्यांचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने कमी दर्जाचे फूड सप्लिमेंट साठा जप्त ...

Read more

अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात निकृष्ट दर्जाचा तेल साठा जप्त

मुक्तपीठ टीम अन्न व औषध प्रशासनाच्या बृन्हमुंबई कार्यालयाने टाकलेल्या छाप्यात निकृष्ट दर्जाचा तेलसाठा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध ...

Read more

औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणी ४८ लाखांचा साठा जप्त

मुक्तपीठ टीम   "मायफेअर क्रिम" चे उत्पादक झी लॅबोरटरीज लि., पोआंटा साहिब, हिमाचल प्रदेश या औषधांच्या लेबलवर अविश्वसनीय सौंदर्यता व त्यामध्ये असलेल्या माहितीपत्रकावर 'त्वचेचा ...

Read more

औषधांची आक्षेपार्ह जाहिरात करणाऱ्यांना दंड, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

मुक्तपीठ टीम औषधे व जादुटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती ) कायदा १९५४ व नियमांतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून औषधांची आक्षेपार्ह जाहिरात करणाऱ्या ...

Read more

“दुग्धजन्य आणि इतर अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी”: डॉ. राजेंद्र शिंगणे

मुक्तपीठ टीम राज्यातील जनतेला सकस, निर्भेळ आणि भेसळमुक्त मिठाई व इतर अन्न पदार्थ मिळणे गरजचे आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व ...

Read more

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या पूर्वतयारीचा आरोग्यमंत्र्यांकडून आढावा

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री ...

Read more

गर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस

मुक्तपीठ टीम गर्भपाताकरीता वापरात येणाऱ्या औषधाची Medical Termination of Pregnancy Kit (MTP KIT ) ऑनलाईन विक्री होत असल्याप्रकरणी अन्न व ...

Read more

ताज्या बातम्या

error: Content is protected !!