Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरकारी शाळा होणार हायटेक! ॲमेझॉनची सहकार्याची तयारी! धारावीच्या शाळांमध्ये टॅबवाटप!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
tab distribution

मुक्तपीट टीम

महाराष्ट्रातील सरकारी शाळा आता हायटेक होण्यास आतंरराष्ट्रीय कंपन्यांचं सहकार्य मिळणार आहे. राज्यातील सर्व शासकीय शाळांमधून तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण, अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सूचना करणे यासाठी ॲमेझॉनने सहकार्य करण्यास तयारी दर्शविली आहे. त्याची सुरूवात प्रतिनिधिक स्वरूपात टॅब वितरण करून झाल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

 

सरकारी शाळा हायटेक करण्यासाठी ॲमेझॉन कसे करणार सहकार्य?

  • विद्यार्थ्यांना शिक्षणात तंत्रज्ञानाची मदत होण्यासाठी ॲमेझॉन सहकार्य करणार आहे.
  • राज्यातील 488 आदर्श शाळांमधील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण केले जाईल.
  • संगणकशास्त्रातील कोडिंग लॅबसाठी सहकार्य मिळेल.
  • ॲमेझॉनच्या मुलींच्या शिष्यवृत्तीमध्ये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थिनींचा समावेश करण्याची तयारी दाखवण्यात आली आहे.
  • सर्व शासकीय शाळांमधील शिक्षकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यास सहकार्य मिळेल.
  • पुणे येथे सायन्स सिटीच्या उभारणीमध्ये तंत्रज्ञानाची मदत केली जाईल.
  • केंद्र सरकारच्या सूचनेनुसार नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत 2022 पासून तंत्रज्ञान आधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मदत करण्यात येईल.
  • त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देण्यासाठी ॲमेझानचे सहकार्य लाभणार आहे.

 

डिजिटाईज्ड वर्गांसाठी ॲमेझॉनकडून विद्यार्थ्यांना टॅब

  • शालेय शिक्षण विभागामार्फत डिजिटाईज्ड वर्ग केले जाणार आहेत.
  • यामध्ये देखील ॲमेझॉनच्या सहकार्याची सुरूवात म्हणून मुंबईच्या धारावी मधील महानगरपालिकेअंतर्गत शाळांमधील 769 विद्यार्थ्यांना टॅब दिले जाणार आहेत.
  • नियमित अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा उपयोग करता येणार आहे.
  • आज हिंदी माध्यमिक शाळा (संत कक्कया शाळा इमारत) दादर, काळा किल्ला मराठी प्राथमिक शाळा, काळा किल्ला एमपीएस माध्यमिक, टी.सी.मनपा मराठी माध्यमिक शाळा, टी.सी.मनपा उर्दू माध्यमिक शाळा, टी.सी.मनपा इंग्रजी माध्यमिक या शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात टॅब चे वितरण करण्यात आले.

 

राज्यात शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून तांत्रिक सहकार्यासाठी ॲमेझॉनने सहकार्य करण्यास तयारी दर्शविली आहे. यासंबंधी प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभा सदस्य रोहित पवार, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, ॲमेझॉन इंडियाचे संचालक सलीम मेमन, ॲमेझॉन सीएसआरच्या प्रमुख मनिषा पाटील, फ्युचर इंजिनिअरचे प्रमुख अक्षय कश्यप, पब्लिक रिलेशन्स टीमच्या माधवी कोचर, लिडरशीप फॉर इक्व‍िटी चे मधुकर बानुरी, पब्लिक पॉलिसीच्या स्मृती मिश्रा यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 


Tags: amazonDharavi schoolsdigitised classesgood newsGovernment schoolsMaharashtra Government Schoolmuktpeethtab distributionचांगल्या बातम्याटॅबवाटपडिजिटाईज्ड वर्गधारावी शाळामहाराष्ट्र सरकारी शाळामुक्तपीठसरकारी शाळाॲमेझॉन
Previous Post

राज्यात २७ हजार ९७१ नवे रुग्ण, ५० हजार १४२ रुग्ण बरे होऊन घरी! कोणत्या जिल्ह्यात, महानगरात किती…

Next Post

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी ६०० कोटी, प्रलंबित निधी शेतकऱ्यांना तात्काळ मिळणार!

Next Post
Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Project

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी ६०० कोटी, प्रलंबित निधी शेतकऱ्यांना तात्काळ मिळणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!