Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home चांगल्या बातम्या प्रेस रिलिज

टी- सीरिज आयपीआरएसमध्ये सहभागी; भारतीय संगीत क्षेत्रासाठी फायद्याचे पाऊल

April 2, 2021
in प्रेस रिलिज
0
T series and IPRS

मुक्तपीठ टीम

 

टी-सीरिज आणि द इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटी लिमिटेड (IPRS) यांच्या संयुक्त प्रसिद्धी पत्रकात जाहीर करण्यात आले की, सुपर कॅसेट्स इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणजेच टी-सीरिज म्हणून लोकप्रिय असलेल्या कंपनीने आयपीआरएसचे सदस्यत्व घेतले आहे.

 

टी-सीरिज हे भारतातील आघाडीचे म्युझिक लेबल आणि भारताचा सर्वात मोठा चित्रपट निर्मिती स्टुडियो आहे. भूषण कुमार हे या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असून त्यांनी आयपीआरएसमध्ये २००,०००हून अधिक शीर्षकांची लायब्ररी आणली आहे. या शीर्षकांममध्ये ५०,००० हून अधिक म्युझिक व्हिडियो आहेत, ज्यात १५,००० हून अधिक तासांचे संगीत समाविष्ट आहे. यात हिंदी, पंजाबी, भोजपुरी, हरयाणवी, बंगाली, गुजराती, मराठी, राजस्थानी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम, ओरिया इत्यादी पंधरा भारतीय भाषांमधील संगीत रचना, आणि गीते गाण्यांच्या/म्युझिक व्हिडीयोंच्या माध्यमातून समाविष्ट आहेत.

 

टी-सीरिजने सहभागी होणे म्हणजे भारतीय संगीत क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण आहे आणि त्यामुळे संगीत रचनाकार, गीतकार आणि मालक, प्रकाशक यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नोंदणीकृत इंडियन कॉपीराइट सोसायटी असलेल्या आयपीआरएसमध्ये अमूलाग्र सकारात्मक बदल घडून येणार आहे. टी-सीरिज सदस्य झाल्यामुळे आयपीआएरएसचे लेखक आणि संगीत रचनाकार असलेल्या सदस्यांना खूप फायदा होणार आहे. आयपीआरएस आता टी-सीरिजच्या गीते व संगीत रचनांच्या म्युझिक पब्लिशिंग कॅटलॉगचे प्रतिनिधीत्व करेल आणि विविध प्रकारच्या प्लॅटफॉर्म आणि व्यवसायांना परवाना देईल जे भारतीय संगीताचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यामुळे भारतातील म्युझिक पब्लिशिंग इकोसिस्टिममध्ये वृद्धी होईल आणि विविध म्युझिक लायसन्सी म्हणजे प्रक्षेपक, डिजिटल सेवा, टेलिकम्युनिकेशन कंपन्या आणि इतर असे अनेक छोटे व्यवसायांसाठी उद्यमसुलभतेत सुधारणा होईल. परिणामी अशा कंपन्यांना ध्वनिमुद्रण किंवा म्युझिक व्हिडीयोमधील कामासाठी सुरळीत एकल खिडकी क्लिअरन्ससाठी म्युझिकचा परवाना घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हे काम सुलभ होणार आहे.

 

आयपीआरएसचे अध्यक्ष प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर म्हणाले, “मी याला टी-सीरिजची घरवापसी मानतो आणि आपल्या कॉपीराइट कॅटलॉगसाठी आयपीआरएसवर विश्वास ठेवल्याबद्दल मी भूषण कुमार आणि टी-सीरिज कुटुंबाला मनापासून धन्यवाद देतो. यामुळे टी-सीरिज आणि आमचे लेखक आणि संगीत रचनाकार सदस्य या दोघांचाही लाभ होणार आहे. संपूर्ण संगीत क्षेत्र आज एक झाले आहे आणि रचनाकार, संगीत व्यवसाय हे सर्व एकाच हेतूने एकत्रितपणे काम करणार आहेत. आयपीआरएसमधील माझ्यासारख्या इतर संचालकांचेही असेच मत आहे आणि आयपीआरएसच्या संचालक मंडळात स्वागत करण्यास उत्सुक आहे.”

 

टी-सीरिजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार म्हणाले, “टी-सीरिज जी निर्मिती करते, त्याचा कॉपीराइट हा गाभा आहे. आम्ही आयपीआरएसमध्ये सहभागी होणे हे कंपनीचे सहाजिक पुढचे पाऊल आहे. आम्ही संपूर्ण संगीत क्षेत्राच्या हितासाठी हा निर्णय घेतला – आज संपूर्ण क्षेत्र, क्रिएटर्स, संगीत व्यवसाय, सर्व एकत्र आहेत आणि ते सर्व भागधारकांच्या एकीचे प्रतिनिधीत्व करतात जे आपल्या देशाच्या प्रगतीसाठी योगदान देत आहेत आणि आपल्या समान हितासाठी एकत्रितपणे काम करत आहेत. टी-सीरिज आयपीआरएस आणि त्याच्या सदस्यांसाठी अधिक मूल्य घेऊन येईल. आमच्या समर्थनाने भविष्यात आयपीआरएसची व्याप्ती अधिक वाढेल, जेणेकरून क्रिएटर्सचा समुदाय आणि क्षेत्राला अधिक लाभ होऊ शकेल.”

 

भारत व दक्षिण आशियातील युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक देवराज सान्याल म्हणाले, “भारतातील संगीत क्षेत्रातील पब्लिशिंग बिझनेसमध्ये परिणामकारकपणे बदल घडण्यासाठी ओनर पब्लिशर्स आणि आपल्या आदरणीय संगीतरचनाकारांसाठी न्याय, पारदर्शक व योग्य मोबदला मिळावा यासाठी सर्व महत्त्वाच्या संबंधितांनी एकत्र येणे गरजेचे आहे आणि आता आयपीआरएसमध्ये माझे मित्र भूषण कुमार यांची त्यांची टीम सहभागी झाल्यामुळे तो दिवस आला आहे. जावेद साहेब, भूषण आणि मंडळातील इतर सर्व सदस्य यांच्यासह क्रिएटर्स आणि कॉपीराइट ओनर्स यांच्यासाठी सुवर्ण काळ येईल याची मला खात्री आहे.

 

आयपीआरएसचे सीईओ राकेश निगम म्हणाले, “टी-सीरिज आयपीआरएसमध्ये सहभागी होत असल्याने मी खूप आनंदी झालो आहे. यामुळे आयपीआरएसचे लेखक आणि म्युझिक कंपोझर्सचा खूप फायदा होणार आहे. टी-सीरिज हे म्युझिक आणि चित्रपट क्षेत्रात मार्केट लीडर आहेतच, त्याचप्रमाणे नवोदितांना संधी देणारी एक अत्यंत यशस्वी प्रयोगशाला आहे आणि त्यांनी अनेक तरूण कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे आणि त्यांनी आयपीआरएसशी सहयोग केल्याने त्या सर्वांचा लाभ होणार आहे.

 

About IPRS

IPRS is India’s only Copyright Society registered under the Copyright Act, 1957, and counts more than 5,000 of India’s best-known authors, composers, and music publishers as its members. IPRS is authorized under Sec 33 of the Copyright Act, 1957 to carry on the business of issuing and granting of licenses in respect of musical works and literary works associated with musical works assigned to it by its members as well as to collect and distribute the Authors’ Statutory Royalties, for the exploitation of these works either by way of live performances and/or sound recordings through any medium except when exhibited as a part of a cinematograph film shown in a cinema hall.


Tags: IndiaIndian music sectorIPRSjaved akhtart-seriesआयपीआरएस
Previous Post

कोरोना विषाणू अधिक संसर्गजन्य, पण कमी प्राणघातक ठरण्याची शक्यता!

Next Post

कोरोना लस घेतल्यानंतर काय करावं, काय टाळावं?

Next Post
vaccination

कोरोना लस घेतल्यानंतर काय करावं, काय टाळावं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!