Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना विषाणू अधिक संसर्गजन्य, पण कमी प्राणघातक ठरण्याची शक्यता!

April 2, 2021
in आरोग्य
0
corona (2)

मुक्तपीठ टीम

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. दिवसेंदिवस कोरानाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. परंतु दुसर्‍या लाटेतील मृत्यूप्रमाण पाहिले तर सध्या कोरोना विषाणू अधिक संसर्गजन्य ठरत असेल परंतु कमी प्राणघातक ठरण्याची शक्यता आहे. काही डॉक्टरांच्या मते आणखी काही दिवसांच्या आकडेवारीचा अभ्यास करुनच याविषयी भाष्य करणे योग्य राहिल.

 

कोरोना महामारीचा मागील वर्षी जानेवारीत सुरू झालेला पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये शिखरास पोहचला. या वर्षाच्या फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत संसर्गवेग घटला होता. फेब्रुवारीनंतर सुरू झालेल्या नवीन टप्प्यात बहुतेक राज्ये जिथे संसर्ग पुन्हा वाढत आहे.

 

महाराष्ट्रात, पहिली लाट ९ मार्च २०२० रोजी सुरू झाली आणि २२ डिसेंबर २०२० रोजी संपली. जेव्हा दररोजच्या सरासरी प्रकरणे किमान पातळीवर पोहचली तेव्हा या २८८ दिवसांच्या कालावधीत १९ लाख प्रकरणे नोंदली गेली. त्यांची सरासरी २२ डिसेंबरपासून दिवसाला ६,६०६ आहे. राज्यात प्रकरणांमध्ये आणखी वाढ दिसून येत आहे. शुक्रवारी एका दिवसात ४३ हजार नवे रुग्ण सापडले आहेत.

दैनंदिन प्रकरणांमध्ये होणारी वाढ होत असतानाच मृत्यूंचे प्रमाण तेवढे नाही. गेल्या लाटेशी तुलना करता मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. पंजाबमध्ये ४१%, गुजरातमध्ये ८३%, मध्य प्रदेशात ७२% आणि चंदीगडमध्ये ६५% घट झाली आहे. तज्ज्ञांच्या मते संपूर्ण देशाचा विचार करता, एकूण मृत्यूचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत एक तृतियांश आहे, कारण हा विषाणू अधिक संसर्गजन्य आणि कमी प्राणघातक आहे असे दिसते. त्यामुळे सध्याच्या टप्प्यात मृत्यूसंख्या कमी असण्याची शक्यता आहे.

 

अर्थात महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत असतानाच आता मृत्यूसंख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे सध्याच्या लाटेबद्दल आणखी काही दिवसांनी भाष्य करणे योग्य राहिल असेही काही डॉक्टरांचे मत आहे.


Tags: delhipunjabकोरोनामहाराष्ट्र
Previous Post

#मुक्तपीठ शुक्रवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post

टी- सीरिज आयपीआरएसमध्ये सहभागी; भारतीय संगीत क्षेत्रासाठी फायद्याचे पाऊल

Next Post
T series and IPRS

टी- सीरिज आयपीआरएसमध्ये सहभागी; भारतीय संगीत क्षेत्रासाठी फायद्याचे पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!