मुक्तपीठ टीम
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि बांगलादेश निर्मिती म्हणजेच विजय दिवसाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यातील स्वरूपवर्धिनीने सायकल भ्रमण मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेला पुण्यातील तरुणांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पुण्यातील विविध भागांमधील ७५ युवकांनी पुणे ते श्रीवर्धन ते पुणे असा ३७५ किलोमीटरचा सायकल प्रवासाचा निश्चय केला. तसेच या मोहिमेत भारताच्या एकतेचा व अखंडतेचा जयघोष गावोगावी करण्याचा संकल्प केला होता. प्रत्यक्ष या संकल्पात १०० जणांनी यात सहभाग घेतला. पुणे येथून निघताना संविधान प्रास्ताविका वाचन, तिरंगा अभिवादन करून सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ यांनी सायकल भ्रमण मोहिमेला झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या.
सायकल मोहीमेतून देशप्रेमाची आणि जनसंवादाची संधी ! – आनंद सराफ
परिश्रमपूर्वक प्रवासाने, मातृभूमीचे अनोखे दर्शन आणि जनसंवादाची संधी उपलब्ध होते. सायकल मोहीमेतून, पुस्तकातील प्रतिज्ञा जगण्याचे धडे मिळण्याची संधी लाभते असे विचार सामाजिक कार्यकर्ते आणि सायकल प्रवासी आनंद सराफ यांनी व्यक्त केले.
मोहिमेचा दुसरा दिवस श्रीवर्धनमध्ये
दुसऱ्या दिवशी श्रीवर्धन येथे पोचल्यानंतर प्रभाकर जोशी यांनी तरुण क्रांतिकारक मोहनलाल धिंग्रा यांच्या क्रांतीकार्याची माहिती तरुणांना दिली. देशाच्या स्वातंत्र्यात सहभागी भगतसिंग,सावरकर, महात्मा गांधी अशा सर्व क्रांतिकारकांच्या पराक्रमाची कथा संपूर्ण सायकल प्रवासात गावोगावी सांगण्यात आली प्रत्येक ठिकाणी जय घोष देशभक्तीपर गीते व क्रांतिकारक कथाकथन करण्यात आले. माणगाव येथे आदिवासी आश्रम शाळेत सव्वाशे मुलांसमोर क्रांतिकारकांची कथा किरण ननावरे यांनी सांगितली. दिनांक १६ डिसेंबर रोजी सुरू केलेला सायकल प्रवास ३७५ किलोमीटरचे अंतर पूर्ण करून रविवार १९ डिसेंबर रोजी पुण्यात पूर्ण झाला.
या सायकल सहलीत वयोवर्षे १६ ते ४६ पर्यंतचे युवक सहभागी झाले होते.पुणे-माणगाव-म्हसळा-श्रीवर्धन-तासगाव-ताम्हिणी-पौड-पुणे असा प्रवास अतिशय उत्साहात युवकांनी पूर्ण केला. मोहिमेत ७५ युवकांचा सहभाग अपेक्षित असताना प्रत्यक्षात शंभरावर सहभागी झाले, अशी माहिती स्व-रूपवर्धिनीचे पूर्णवेळ कार्यकर्ता निलेश धायरकर यांनी दिली.
संकल्प :- येत्या वर्षभरात ७५ ठिकाणी क्रांतिकारकांच्या कथाकथन कार्यक्रम व देशसेवेसाठी आयुष्यात प्रधान्यता देण्याचा संकल्प युवकांनी या सायकल मोहिमेत केला आहे. या मोहिमेची प्रमुख म्हणून मनोज जायगुडे, अक्षय मुळे, सतीश बिराजदार, आकाश देशमुख यांनी काम पाहिले.
सायकल भ्रमण मोहीम कशासाठी होती?
- स्वातंत्र्याची पंचाहत्तरी(आझादी का अमृत महोत्सव) आणि बांगलादेश निर्मितीचा सुवर्ण महोत्सव (स्वर्णिम विजय दिवस) निमित्ताने स्व-रूपवर्धिनीचं सायकल भ्रमण
- गावोगावी क्रांतिकारक पूजन, तिरंगा सम्मान व राष्ट्र अभिवादन कार्यक्रम
- पुण्यातील ४० हुन अधिक वस्ती व पेठातील ७५ युवकांनी देशाच्या एकता व अखंडतेसाठी संविधान वाचन व राष्ट्रगीत गायन करत करत ३७५ किलोमीटर प्रवास केला आहे.
- सायकल भ्रमण मार्ग – पुणे – श्रीवर्धन – पुणे
- कालावधी – १६ ते १९ डिसेंबर २०२१
स्वरुपवर्धीनीच्या सायकल भ्रमण मोहिमेतील टीम
- अक्षय मुळे
- मनोज जायगुडे
- मंदार सोनावळे
- अक्षय भेगडे
- मोहन कानडे
- श्रीराज गुरसाळे
- राहुल गोरे
- निहाल काळे
- रोहित शिंदे
- सागर चव्हाण
- योगेश गायके
- राकेश चांदेकर
- धीरज शर्मा
- तुषार काळे
- चेतन महिंद्रकर
- विनेश नगरे
- निशिकांत वाईकर
- चैतन्य घेवारे
- सौरव मोरे
- यश वाकिकर
- सुजित परब
- ओंकार वडजे
- आयुष खोपडे
- ओंकार सकट
- शुभम लोंढे
- प्रथमेश शिळीमकर
- पियुष उभे
- तान्हीजी जनजाड
- संदिप पॉल
- शुभम कामठे
- रोहन देशमुख
- संदेश सोनकांबळे
- सिद्धार्थ सोनकांबळे
- गणेश व्हणमाने
- ओम खंदारे
- सोहम इजंतकर
- मेघराज फरकाळे
- वैभव सपकाळ
- ओम इजंतकर
- रोहीत किल्लेकर
- धनंजय नवगिरे
- विजय जाधव
- गणेश कांबळे
- महादेव नंदगिरी
- महेश रोंगे
- आशिष सावंत
- अथर्व धाडवे
- अमरेश तांबोळकर
- अभिषेक पोकळे
- शशांक बनगार
- हर्षद पेंढार
- किरण ननावरे
- पुष्कर सागडे
- सतिश बिराजदार
- योगेश धोत्रे
- शिवप्रसाद धोत्रे
- चेतन धोत्रे
- रोहन धाडवे
- हर्षल नरवडे
- अभि कुर्ले
- प्रतीक बोरकर
- समर्थ भोरडे
- सौरभ दिवडे
- ऋषिकेश शिंदे
- वेदान्त घोडे
- निखिल साबळे
- हर्षवर्धन गायकवाड
- ॠतिक सणस
- अभिषेक गायकवाड
- प्रथमेश पोकळे
- ओंकार साका
- भुमेश जाधव
- अनिकेत कावनकर
- केदार घाटगे
- प्रथमेश राजगुडे
- वैभव दळवी
- रोहित ठाकूर
- अविष्कार वाईकर
- अभय पोते
- अक्षय ठोकरे
- निशांत घोडे
- चंदन महतो
याशिवाय व्यवस्था टीम
पाहा व्हिडीओ: