मुक्तपीठ टीम
नवी मुंबई येथे अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या स्वप्नील देवळेकरचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
फोर्टिस्ट रुग्णालयात त्याच्यावर सुरू असलेला महागडा उपचार न परवडल्याने त्याच्यावर मृत्यूला कवटाळल्या शिवाय पर्याय उरला नाही, आणि दुर्दैवी अंताला त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना सामोरे जावे लागले.
भांडुप मध्ये राहणारा स्वप्निल देवळेकर याचा नवी मुंबई येथे १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ३ ते ४ च्या सुमारास नवी मुंबई येथील महापे येथे अपघात झाला होता. त्या अपघातात गंभीररीत्या तो जखमी झाला होता.
स्वप्निल हा कामासाठी आपल्या भावासोबत नवी मुंबई येथे गेला असता एका टुरिस्ट गाडीला ब्रेक न लागल्याने त्याला मागून टक्कर देत त्यात मागे बसलेला भाऊ आणि तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्या अपघातात स्वप्निलच्या मेंदू, किडनी आणि आतड्यांना मार लागल्याने त्याचा मुलुंड येथील फेटींस्ट रूग्णालयात उपचार चालू होता.
त्याच्या घरची परिस्थिती अगदी हलाकीची असल्याने जनतेकडे मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यात जनतेने देखील उपचारासाठी मदत देखील केली परंतु २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २-३ च्या दरम्यान अखेर स्वप्निलची मृत्युशी झुंज संपली.