मुक्तपीठ टीम
अहमदाबादच्या स्विच बाईक कंपनीने कर्नाटकातील बंगळुरू येथे आयोजित इलेक्ट्रिक व्हेईकल एक्स्पो २०२२ मध्ये त्यांच्या तीन फोल्डिंग इलेक्ट्रिक बाइक्स लाँच केल्या. या फोल्डिंग बाइक्सची नावे आहेत स्विच एम एक्स ई, स्विच एक्स ई आणि स्विच एक्स ई+. हे सर्व मॉडेल्स ३६० डिग्री पर्यंत फोल्ड केले जाऊ शकतात. चला या तिन्ही मॉडेल्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
स्विच एम एक्स ई फोल्डिंग ई-बाईकचे फिचर्स
- ही एक मिनी फोल्डिंग इलेक्ट्रिक बाइक आहे.
- ही मल्टी गियर पर्यायासह येते.
- बाइकच्या हँडलमध्ये स्पीड वाढवण्यासाठी प्लस आणि मायनस मोड आहे.
- बाईकच्या पुढील भागात पॉवरफुल एलईडी लाईट आहे.
- यात २५० वॅटची मोटर आणि ८.७ ए एम पी बॅटरी आहे.
- याचा टॉप स्पीड २५ किलोमीटर प्रति तास आहे.
- एका चार्जवर पॅडल असिस्ट मोडसह याची रेंज ४० कि.मी पर्यंत आहे.
- ही बाईक मधूनच ब्रेक करून फोल्ड करता येते.
- ही बाईक टँगग्रीन ऑरेंज आणि अल्ट्रामॅरीन टार्झन कलर्समध्ये उपलब्ध आहे.
- या फोल्डिंग बाइकची सुरुवातीची किंमत ६६,५०० रुपये आहे.
स्विच एक्स ई फोल्डिंग ई-बाईक आहे कशी?
- ही बाईक मल्टी गियर पर्यायासह येते.
- बाइकच्या हँडलमध्ये स्पीड वाढवण्यासाठी प्लस आणि मायनस मोड देण्यात आला आहे.
- यात डिस्प्ले स्क्रीन देखील आहे.
- बाईकमध्ये राइडिंग मोडसह स्पीड, रँड, बॅटरी यासारखे आवश्यक तपशील आहेत.
- बाईकच्या पुढील भागात पॉवरफुल एलईडी लाईट देण्यात आली आहे.
- यात २५० वॅटची मोटर आणि ११.६ ए एम पी बॅटरी आहे.
- बाइकचा टॉप स्पीड २५ किलोमीटर प्रति तास आहे.
- एका चार्जवर पॅडल असिस्ट मोडसह याची रेंज ८० कि.मी पर्यंत आहे.
- ही बाईक मधूनच ब्रेक करून फोल्ड करता येते.
- ही पिवळी, लाल, निळी, राखाडी आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे.
- त्याची किंमत ९६,९५० रुपये आहे.
स्विच एक्स ई+ फोल्डिंग ई-बाईकचे वेगळेपण…
- या फोल्डिंग इलेक्ट्रिक बाइकमध्ये स्पीड वाढवण्यासाठी प्लस आणि मायनस मोड आहे.
- यात मोठी डिस्प्ले स्क्रीन देखील आहे.
- या फोल्डिंग बाइकमध्ये स्पीड, रँड, बॅटरी यासारखे आवश्यक रायडिंग मोडसही आहेत.
- बाईकच्या पुढील भागात पॉवरफुल एलईडी लाईट देण्यात आली आहे.
- यात २५० वॅटची मोटर आणि १४.५ ए एम पी बॅटरी आहे.
- बाइकचा टॉप स्पीड २५ किलोमीटर प्रति तास आहे.
- एका चार्जवर पॅडल असिस्ट मोडसह याची रेंज १२० कि.मी पर्यंत आहे.
- ही बाईक मधूनच ब्रेक करून फोल्ड करता येते.
- ही बाईक पिवळी, लाल, निळी, राखाडी आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे.
- त्याची किंमत १,१८,९९९ रुपये आहे.
फोल्डिंग इलेक्ट्रिक बाइक्स कशी खरेदी कराल?
- सर्वप्रथम कंपनीच्या अधिकृत वेबसाइट https://svitch.bike ला भेट द्या.
- यानंतर तुम्हाला या बाईकशी संबंधित तपशील आणि किमतीची माहिती मिळेल.
- कंपनी या ई-बाईक अधिकृत पत्ता त्यावर कुरिअर करेल.
- इच्छूक असल्यास, आपण कंपनीच्या मुख्यालयाशी देखील संपर्क साधू शकता.
- यासाठी तुम्हाला 6351272002 किंवा 7227042152 या क्रमांकावर कॉल करायचा आहे.
- व्हॉट्सअॅपवरील ७२२७०४२३५६ या क्रमांकावर जाऊन हाय करा.