मुक्तपीठ टीम
भारतात 125 cc बाईक आणि स्कूटरची मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी या क्षमतेच्या मोटारसायकल आणि स्कूटर सादर केल्या आहेत, ज्यात TVS ज्युपिटर 125 (TVS) यांचा समावेश आहे. त्यामध्ये ज्युपिटर 125 आणि TVS रायडर 125 (TVS रायडर 125) प्रमुख आहेत. आता या सेगमेंटमध्ये, सुझुकीने १८ नोव्हेंबर रोजी भारतात एक उत्तम स्कूटर Suzuki Avenis 125 लाँच केली आहे, जी केवळ पाहण्यासाठीच नाही तर वैशिष्ट्यांच्या बाबतीतही उत्तम आहे. सुझुकीची नवीन स्कूटर Yamaha RayZR 125 आणि TVS Ntorq सारख्या स्कूटर्सशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे.
सुझुकी अव्हेनीस 125 स्कूटर्स भारतात ८६ हजार ७०० रुपये आणि अव्हेनीस रेस एडिशन ८७ हजार रुपये (एक्स-शोरूम) मध्ये लॉन्च करण्यात आल्या आहेत. सुझुकी ऍक्सेस 125 आणि सुझुकी बर्गमान स्ट्रीट 125 नंतर सुझुकीची ही तिसरी 125 cc स्कूटर आहे. अव्हेनीस भारतात ऑरेंज, ब्लॅक, व्हाइट आणि फ्लोरोसेंट ग्रीन कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. ही नवीन सुझुकी स्कूटर मोटोजीपी इंस्पायर्ड कलर एडिशनसह आणली गेली आहे, जी मेटॅलिक ट्रायटन ब्लू शेडने सुसज्ज आहे.
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह सुसज्ज
सुझुकी अव्हेनिस दिसण्यासाठी खूपच स्पोर्टी आहे आणि समोरील बाजूस असलेल्या एलईडी हेडलॅम्पमध्ये एकत्रित डीएलआर मिळतात. यात लहान विंडस्क्रीन, काळा रियर व्ह्यू मिरर, रंगीत क्लॅडिंग मिळेल. यात साइड स्टँड इंटरलॉक, ड्युअल लगेज हुक, स्पोर्टी ग्राफिक्स, अलॉय व्हील, स्प्लिट ग्रॅब रेल आणि एलईडी टेललॅम्प आहेत. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, सुझुकी अव्हेनीस 125 मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल-मेसेज अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन तसेच यूएसबी चार्जर, इंटिग्रेटेड इंजिन स्टार्ट-किल स्विच यासह अनेक विशेष वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.
Suzuki Avenis 125 च्या इंजिन आणि पॉवरबददल विशेष उपलब्धता असेल. यात 124cc सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन मिळेल, जे 8.5bhp पर्यंत पॉवर आणि 10Nm टॉर्क जनरेट करू शकेल. हेच इंजिन बर्गमन स्ट्रीटमध्येही आहे. हे सीवीटी गिअरबॉक्ससह दिले जाते. याचे मायलेज ५० किलोमीटर प्रति लिटरपेक्षा जास्त असू शकते. आगामी काळात सुझुकीची ही स्कूटर रस्त्यांवर दिसणार असून इतर कंपन्यांना आव्हान देण्याची शक्यता आहे.