Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आपली गुंतवणूक करा सुरक्षितरीत्या दुप्पट, पोस्टाचं किसान विकास पत्र!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
india post

मुक्तपीठ टीम

आपल्या जमापुंजीतून पुढील वाटचालीसाठी बचत करणे प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे. बचत आपल्याला भविष्यात अनपेक्षित खर्चाचा सामना करण्यास मदत करते. जर तुम्हाला तुमची बचत दुप्पट करायची असेल आणि कोणतीही जोखीम घ्यायची नसेल, तर तुम्ही भारतीय पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करू शकता. या गुंतवणूक योजनेत, ठेवीदाराला त्याच्या ठेवीवर चांगल्या परताव्यासह सरकारी सुरक्षिततेचा लाभ मिळतो. पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटनुसार, जर तुम्ही या योजनेत १० वर्षे आणि ४ महिने म्हणजेच १२४ महिने गुंतवणूक केली तर तुमची रक्कम दुप्पट होईल.

 

व्याज दराविषयीची सविस्तर माहिती

  • भारतीय पोस्टाच्या किसान विकास पत्र योजनेअंतर्गत, तुमचे पैसे जमा केल्यावर तुम्हाला सध्या वार्षिक ६.९ टक्के व्याजदराचा लाभ मिळेल.
  • या व्याज दरात दरवर्षी वाढ होते.

 

गुंतवणूक रक्कम

  • भारतीय पोस्टाच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवलेल्या रकमेसाठी प्रमाणपत्र जारी केले जाते.
  • कोणतीही व्यक्ती या योजनेत किमान १ हजार रूपये गुंतवून गुंतवणूक करू शकते.
  • जर तुम्ही ५० हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला यासाठी पॅन कार्ड द्यावे लागेल.
  • या पोस्ट ऑफिस योजनेतील गुंतवणुकीवरील व्याज वित्त मंत्रालयाद्वारे ठरवले जाते आणि ते बाजारातील जोखमेशी संबंधित नाही.

 

कोण-कोण या योजनेत सहभागी होऊ शकते

  • पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोणतीही भारतीय व्यक्ती जो प्रौढ आहे, त्याचे खाते उघडू शकते.
  • योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही.
  • या अंतर्गत, अल्पवयीनांच्या नावावर केव्हीपी प्रमाणपत्रे देखील खरेदी करता येतील.
  • एनआरआय या योजनेसाठी पात्र नाही.

 

भारतीय पोस्टच्या किसान विकास पत्र योजनेच्या नावावरून ही योजना शेतकऱ्यांसाठी असल्याचे स्पष्ट होते. मात्र या योजनेचा लाभ कोणीही घेऊ शकतो. या योजनेत, एखाद्या व्यक्तीला केव्हीपी प्रमाणपत्र खरेदी करण्यासाठी किमान १ हजार गुंतवावे लागतात. जर तुम्ही या योजनेत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या पॅन कार्डचा तपशील द्यावा लागेल.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: india postinterest rateinvestmentkisan vikas patra schememuktpeethकिसान विकास पत्र योजनागुंतवणूकभारतीय पोस्टमुक्तपीठव्याज दर
Previous Post

आता मोठे जहाजही विजेवर चालणार, जगातील पहिले बॅटरीवरील ई-कार्गो जहाज समुद्रात!

Next Post

सुझुकी अव्हेनीस-125 स्कूटर भारतात लाँच, हायटेक, स्पोर्टी आणि किफायतशीर!

Next Post
suzuki

सुझुकी अव्हेनीस-125 स्कूटर भारतात लाँच, हायटेक, स्पोर्टी आणि किफायतशीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!