Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाचे निलंबित १२ आमदार राज्यसभेला मत देऊ शकणार, पण विधानभवनाच्या आवाराबाहेर!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bjp 12 mla

मुक्तपीठ टीम

राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्यावेळी सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला होता. यावेळी विरोधीपक्ष भाजपाच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. दरम्यान या निलंबित १२ आमदारांना निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आता या आमदारांना राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. पण निलंबन काळात आमदार विधानभवनाच्या आवारात प्रवेश करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्या मतदानासाठी आवाराबाहेर खास मतदान कक्ष उभारण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत.

निलंबितांचे मतदान, आवाराबाहेर मतदान कक्ष!

  • काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी राज्यात पोटनिवडणूक होणार आहे.
  • निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली होती.
  • ४ ऑक्टोबरला ही पोटनिवडणूक होणार आहे.
  • दरम्यान, या पोटनिवडणूकीत भाजपाचे निलंबित बारा आमदार देखील मतदान करु शकणार आहेत.
  • भारतीय निवडणूक आयोगाने १७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधिमंडळ प्रशासनाला भाजपाच्या निलंबित बारा सदस्यांसाठी मुंबईतील विधान भवनाच्या परिसराबाहेर मतदानासाठी स्वतंत्र बूथ स्टेशनची तरतूद करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

का झालं होते आमदार निलंबित?

  • इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी पावसाळी अधिवेशनावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता.
  • सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली होती. त्याचबरोबर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता.
  • या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं.
  • त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूर करण्यात आला होता.
  • या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

 

हे आहेत निलंबित बारा आमदार!

  1. आशिष शेलार
  2. योगेश सागर
  3. अभिमन्यू पवार
  4. संजय कुटे
  5. अतुल भातखळकर
  6. पराग अळवणी
  7. गिरीश महाजन
  8. राम सातपुते
  9. हरीश पिंपळे
  10. नारायण कुचे
  11. जयकुमार रावत
  12. किर्तीकुमार भांगडिया

Tags: bjp malselection commissionनिवडणूक आयोगपोटनिवडणुकभाजपा
Previous Post

संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयाचा दावा! वाचा पाटलांचे राऊतांना खुपलेले ‘ते’ चार मुद्दे…

Next Post

“कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करा”: उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
ajit pawar

"कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करा": उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!