मुक्तपीठ टीम
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अॅनिमेशन विभागाच्या वतीने बावधन येथील ‘सूर्यदत्त’च्या बन्सीरत्न सभागृहात नुकताच स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गेल्या वर्षातील बीएससी द्वितीय आणि तृतीय वर्षातील पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी छायाचित्रण स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
२०२१-२२ या शैक्षणिक वर्षात बीएससी अॅनिमेशनच्या तृतीय वर्षात अनुप्रिया दुबे (प्रथम), रोहित मंडल (द्वितीय) व हर्षल शर्मा (तृतीय), द्वितीय वर्षातील मृणाल प्रधान (प्रथम), माधवी भुजबळ (द्वितीय), संकल्प वैद्य (तृतीय), आयुष शेट्टी (तृतीय) यांचा सत्कार करण्यात आला. छायाचित्रण स्पर्धेतील ऋषिकेश आवताडे (प्रथम), कृष्णा जोशी (द्वितीय), सुधांशू बोरकर (तृतीय) यांचाही सन्मान करण्यात आला.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. अॅनिमेशन विभागाचे प्रमुख प्रा. अमोल गुप्ते, प्रा. अंशिका जोशी, प्रा. श्वेता यादव यांनी नियोजन केले. सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सुषमा चोरडिया म्हणाल्या ,”कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम, सातत्य व समर्पित वृत्ती गरजेची आहे. अभ्यासाबरोबरच संस्कार, मूल्ये आणि कौशल्य आत्मसात करावीत. या क्षेत्रात मेटॉवर्स, थ्रीडी अनिमेशन, व्हीएफएक्स आदी आधुनिक व नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम असल्याने भारतात व भारताबाहेरही मुलांना पहिल्या वर्षापासूनच चांगल्या अर्धवेळ, ऑनलाईन कामाची व पैसे कमवण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.”
“लघुपट, माहितीपट व अन्य उपक्रम नियमितपणे दिले जातात. त्यातून मुलांना प्रात्यक्षिक ज्ञान व कमावण्याची संधी मिळते. त्यातून स्वयंरोजगार व औद्योगिक क्षेत्राला आवश्यक ते कौशल्ये प्राप्त करतो. त्यामुळे बारावीनंतर असे अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या संधी आहेत,” असे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.