Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रदीप रावत यांना सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२२’ प्रदान

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Pradeep Rawat conferred with 'Surya Bhushan National Award 2022' by Suryadatta Group of Institutes

मुक्तपीठ टीम

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने माजी खासदार प्रदीप रावत यांच्या वारकऱ्यांसाठी व पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते रावत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आशा रावत उपस्थित होत्या.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “प्रदीप रावत यांचे काम अतुलनीय आहे. अत्यंत संयमी आणि प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सामाजिक सेवा आणि राजकीय वाटचाल करीत असतानाच आजही त्यांचे पुस्तक वाचन आणि अभ्यास सुरू आहे. अनेक संस्थांना त्यांचे मार्गदर्शन लाभत असून, त्यातून युवापिढी घडत आहे. विद्यार्थ्यांनी परिस्थितीच्या विद्यापीठाला सामोरे जायला हवे, ही त्यांची धारणा आहे.”

वारकऱ्यांसाठी पोर्टेबल शौचालयाची सुविधा, मैलापाणी व्यवस्थापन करून वारीचे चांगले नियोजन होण्यात त्यांचे योगदान आहे. या मैला पाण्यापासून शेतीला खत उपलब्ध करून देण्याचे काम रावत व त्यांची टीम काम करत आहे. स्वेच्छेने ही अत्यावश्यक सेवा पुरविण्याचे काम स्वयंसेवकांच्या मदतीने करत आहेत. त्याची दाखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले.

प्रदीप रावत म्हणाले, “सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्काराने झालेला सन्मान संस्मरणीय आहे. चांगले शिक्षण ही काळाची गरज असून, त्यानेच आयुष्य घडते. कोणीतरी सांगितल्यावर अभ्यास न करता स्वयंस्फूर्तीने अभ्यास केला पाहिजे. माणूसपण टिकवत मेंदूचा संरक्षक म्हणून वापर केला पाहिजे. आपण एक वेगळी सृष्टी निर्माण करण्याकरिता या मेंदूचा प्रभावी उपयोग करण्याची आवश्यकता आहे.”


Tags: good newsGood news MorningPradeep RawatSurya Bhushan National Award 2022Suryadatta Group of Institutesगुड न्यूज मॉर्निंगप्रदीप रावतसूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार
Previous Post

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अॅनिमेशन विभागाच्या टॉपर्सचा सत्कार

Next Post

भारतीय स्टेट बँकेत मॅनेज पदांवर ६४ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post
SBI

भारतीय स्टेट बँकेत मॅनेज पदांवर ६४ जागांसाठी नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!