मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या सतत कार्यमग्नतेसाठी ओळखले जातात. आजची सकाळही अपवाद नव्हती. मंगळवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शरद पवारांवर तातडीची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर ते सकाळी आराम करतील, अशीच अपेक्षा होती. मात्र, तसं झालेलं नाही. आज सकाळीही त्यांनी नेहमीप्रमाणेच त्यांचं आवडतं काम केले…ते म्हणजे वृत्तपत्र वाचनाचं!
खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. सकाळी त्यांनी शरद पवारांचे वृ्त्तपत्र वाचतानाचे छायाचित्र ट्विट केले. त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं, “सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय @PawarSpeaks साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत.”
सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय @PawarSpeaks साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत. pic.twitter.com/ERf0Gl35Tp
— Supriya Sule (@supriya_sule) March 31, 2021
खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटल्या प्रमाणे त्यांच्या या ट्विटमुळे पवारांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी आजची सकाळ प्रसन्न झाली. शरद पवार यांच्यावर केमोथेरेपी सुरु असतानाही त्यांनी वेदना सहन करतही आपला दिनक्रम तसाच सुरु ठेवला होता. त्यांच्या मांडीचे हाड मोडल्यानंतरच्या शस्त्रक्रियेनंतरही ते त्वरित सक्रिय झाले होते. तेही काठी वगैरे न घेता. त्यामुळे आजची त्यांची सक्रियता त्यांच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी ठरली आहे.