मुक्तपीठ टीम
कोरोना काळात देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेसनं केलं. काँग्रेसनं यूपी-बिहार राज्यातील नागरिकांना मुंबईतून बाहेर जाण्यासाठी उकसवलं. लॉकडाऊनमध्ये मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटे काढून दिली, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतला आहे. सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका केली.
मोदी भाजपचे पंतप्रधान नसून देशाचे पंतप्रधान…
- “दीड तासांचं पंतप्रधानांचं भाषण झालं.
- खूप अपेक्षेनं मी त्या भाषणाकडे पाहत होते.
- कारण खूप अडचणीच्या काळातून आपला देश चालला आहे.
- महामारीतून संपूर्ण जग हळूहळू बाहेर पडतंय.
- त्यामुळे माननीय पंतप्रधानांनी आपल्या सर्वांना एक दिशा द्यावी, अशी अपेक्षा होती.
- पण दुर्दैव की, आपल्या महाराष्ट्राबाबत पंतप्रधान जे बोलले ते दुर्दैवी.
- मला स्वतःला वैयक्तिकपणे दुःख देणारी गोष्ट.
- ज्या राज्यानं फुल न फुलाची पाकळी म्हणा.
- पण १८ खासदार भाजपाला महाराष्ट्रानं निवडून दिले आहेत.
- म्हणजे, मोदींना पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्रातील मतदारांचा मोठा वाटा आहे.
- त्या महाराष्ट्राच्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान कोरोना सुपर स्प्रेडर म्हणून त्यांनी केला.
- हे अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे.
- ते भाजपचे पंतप्रधान नसून देशाचे पंतप्रधान आहेत.
- “एका पक्षाच्यावतीनं पंतप्रधान बोलत होते हे पाहून मला दुखः झालं.
- पंतप्रधानांचा मान सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे आणि त्यामध्ये पक्ष येत नाही.
- ते पद पक्षाचं नाही.
- मोदी भाजपचे पंतप्रधान नसून देशाचे पंतप्रधान आहेत.”
पंतप्रधानांनी केलेलं विधान दुर्देवी
- बुकिंग इन श्रमिक स्पेशल ट्रेनचा आढावा केंद्र सरकारनेच घेतला होता.
- गुजरात राज्यातून १ हजार ३३ आणि महाराष्ट्रातून ४१७ ट्रेन चालवल्याचं केंद्राने स्पष्ट केलं आहे.
- ट्रेन महाराष्ट्र सरकार चालवत नाही.
- केंद्र चालवतं.
- कोणती ट्रेन कधी जाणार हे केंद्र सरकार ठरवतं.
- आमच्याकडे ट्रेन नाही तर लोकांना कसं पाठवणार? आम्ही बस देऊ शकतो, ट्रक देऊ शकतो.
- पण ट्रेन देऊ शकत नाही.
- त्यामुळे पंतप्रधानांनी केलेलं विधान दुर्देवी आहे.
गोयल यांच्या ट्वीटचा आढवा
- मी कोणत्याही राज्याचा प्रचार करत नाही.
- सर्व राज्यांबद्दल मला आदर आहे.
- कोरोना काळात मजुरांना दिलासा दिल्याबद्दल पीयूष गोयल यांचे मी अनेकदा आभार मानले आहेत.
- ते रेल्वेमंत्री असताना मी त्यांच्याशी अनेकदा बोलले.
- त्याकाळात ट्रेन सुरू करण्याबाबत त्यांनी ट्विट केले होते.
- उद्धवजी, प्रकृतीची काळजी घ्या.
- आम्ही श्रमिक सोशल ट्रेन सुरू करणार आहोत.
- किती लोकांना पाठवायचं आहे याचा डेटा तुमच्याकडे आहे का? असं गोयल म्हणाले होते.
- तसं ट्विट त्यांनी केलं होतं.
- गोयल महाराष्ट्राचे आहेत.
- महाराष्ट्राला किती ट्रेन हव्यात हे त्यांनीच विचारलं होतं.
- २४ मे रोजी त्यांनी पाच ट्विट केले होते.
- त्यात त्यांनी ट्रेन सुरू करण्यावर भाष्य केलं होतं.
त्यामुळे मजुरांना आम्ही त्यांच्या राज्यात पाठवत होतो हे कसं म्हणता?
- पीयूष गोयल यांनी रेल्वे सुरू करत असल्याचं सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी रिट्विट करत त्यांचे आभार मानले होते.
- केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली.
- त्यांचं खूप खूप आभार.
- त्यांनी लगेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करून गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
- मुंबईहून लवकरच दहा गाड्या रवाना होतील, असं ट्विट फडणवीस यांनी केलं होतं.
- फडणवीस आणि गोयल हे महाराष्ट्राचे नेते आहेत.
- त्यांनीच हे विधान केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
- भाजपाचे खासदार हरिश द्विवेदी यांनीही गेल्या आठवड्यात संसदेत ट्रेन सुरू करण्याचं श्रेय भाजपाचं असल्याचं म्हटलं आहे.
- त्यामुळे कोरोना काळता मजुरांना आम्ही त्यांच्या राज्यात पाठवत होतो हे कसं म्हणता?
का पंतप्रधान मोदी तुम्ही राज्या-राज्यात द्वेष पसरवत आहात?
- आम्ही सुपर सप्रेड आहोत असं कसं बोललात? तुम्ही थोडाही शास्त्रीय आरोप केला असता तरी मी कबूल केला असता.
- मी केवळ टीका करायची म्हणून टीका करत नाही.
- मी महाराष्ट्राची कन्या म्हणून त्यांच्याकडे न्याय मागते आहे.
- तुम्ही का म्हणून असा आरोप केला? का तुम्ही राज्या-राज्यात द्वेष पसरवत आहात? ही एक प्रांजळ महिला
- पंतप्रधानांकडे न्याय मागते.
- पंजाब ही संताची भूमी आहे.
- त्यांचं आपलं नातं जवळचं आहे.
- उत्तर प्रदेशाची आपलं नातं आहे.
- चंद्रशेखर यांचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम होतं.
- ते पंतप्रधान होऊन गेलं.
- त्यांच्याशी आपले घनिष्ट संबंध.
- यूपी-बिहारचे लोक आपल्याकडे येतात.
- पण आपल्यात आणि त्यांच्यात अंतर आणण्याचं काम पंतप्रधानांच्या भाषणातून होऊ शकतं हे मला धक्कादायक आणि दुर्देवी आहे.