रोहिणी ठोंबरे
गेल्या काही दिवसांपासून शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारासोबत बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यांनी महिला पत्रकाराने टिकली लावली नसल्याने तिच्याशी बोलण्यास नकार दिला होता. आता या वादानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही या वादात दिसत आहेत. सुप्रिया सुळेंनी चॅनलमधल्या मुली अर्थात स्त्री अँकर या साडी का नेसत नाही. त्या शर्ट ट्राऊझरत का घालतात, असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
पुण्यातील चिंचवडमध्ये आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३व्या अधिवेशनात सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केले आहे. पण या कार्यक्रमातले सुप्रिया सुळे यांचे वेगळे वादग्रस्त वक्तव्य मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाले असले तरी त्यावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही.
सुप्रिया सुळेंनी केलेले वादग्रस्त वक्तव्य
- मराठी चॅनेल मधल्या मुली साड्या का नाही नेसत?, त्या शर्ट आणि ट्राऊजर का घालतात?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
- तुम्ही मराठी बोलता ना, मग मराठी संस्कृतीसारखे कपडे का नाही घालत?
- आपण सगळ्या गोष्टींचे वेस्टर्नाझेशन का केले आहे?
- न्यूज चॅनलमधल्या मुली मराठी भाषा बोलता मग साडीच नेसा, असे सुळेंनी महिला पत्रकारांना सुनावले आहे.
सुप्रिया सुळेंच्या ‘या’ वक्तव्य चित्रा वाघ यांची घणाघाती टीका!
- भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या वक्तव्याला विरोध करत चांगलीच टीका केली आहे.
- टिकलीवर टीका करणारे साडीवर या नेत्यांना सोलणार का..? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
- सुप्रिया सुळेंना बोललं तरी एवढा राडा केला बाकीच्या महिला काय रस्त्यावर पडल्यात का?
- सत्तारांचं समर्थन करत नाही पण सुप्रिया सुळेंसारखा न्याय सगळ्याच महिलांना द्या.
- आमच्यावरही कमरेखालचे शब्द बोलले जातात तेव्हा का कोणी आवाज उठवत नाही, तेव्हा का माध्यमं पण गप्प बसतात” असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
सुधीर मुनगंटीवार यांची सुप्रिया सुळेंवर टीका
सुप्रिया सुळेंनी एक तत्वज्ञान सांगितलं. कोणी काय घालावे, कोणी काय परिधान करावे, काय त्यांचा वेश असू शकेल, हा महिलांचा अधिकार आहे. हा पॉलिटिकल अल्झायमर नावाचा रोग आहे ज्यात येते. यामध्ये आपण काल काय बोललो आणि आज काय बोललो याचं भान नाही आहे.
सामान्यांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र
समस्त पुरोगामी लोकांच्या पुढे असणारा प्रश्न,
साडी घालून समर्थन करायचे की स्कर्ट घालून विरोध! #SupriyaSule 🤡— Ganesh Pawar (@GaneshaSpeaks_) November 20, 2022
टिकली लावायची नाही हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणणारे. ड्युटीवर ड्रेस कोड घालावा का साडी हे शिकवायला लागलेत.#supriyaSule
— Mayur Divekar (@MayurDi12779143) November 20, 2022
आपण कुठे चाललोय आणि पुढे आणखीन काय काय वाढून ठेवलं आहे? आणि हे असे progressive म्हणणारे नेते पण असे वागायला लागले तर खरंच कठीण आहे. (2/2) #supriyaSule
— Purva Chitnis (@ChitnisPurva) November 21, 2022
व्वा ! @supriya_sule खरं तुमच्या मागणीचे कौतूक करायला हवं. पण, तुमची मागणी सवित्र्याच्या लेकीचं स्वातंत्र्य हिरावून घेणारी आहे.@ChakankarSpeaks मॅडम, सुप्रियाताई याना नोटीस पाठवा. pic.twitter.com/04F5fhJmVL
— Prakash Gade (@PrakashGade13) November 20, 2022
मटा ‘साडी’ विना!
महिलांना टाचेखाली ठेवण्याचा प्रत्येक प्रयत्न आणि प्रवृत्तीचा निषेध. साडी नेसावी की नाही इथपासून प्रत्येक निर्णयासाठी महिला स्वतंत्र आहेत, हे पुरुषप्रधान मानसिकतेला जडच जाणार.
Right?@yaminisapreMT @supriya_sule @BPragatiMT @JchaitaliMT @SuchitrasurveMT @SoniyaMT pic.twitter.com/VDQn4fN1xK
— Sunaina Holey (@SunainaHoley) November 20, 2022