मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काश्मिरी पडितांचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. जम्मू-काश्मिरच्या अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर टीका करत गेल्या ६० वर्षांत जे घडलं ते घडलं, आता तुम्ही गेल्या सात वर्षात काश्मिरी पडितांसाठी काय केले आहे? हे सांगा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. जम्मू आणि काश्मीरच्या अर्थसंकल्पावर चर्चेदरम्यान सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
- तुम्हाला काश्मिरी पंडितांसाठी कळवळा येत आहे, तर त्यांचा अर्थसंकल्पात समावेश करा, त्यांच्यासाठी वेगळ्या तरतुदी करा.
- नेहमीच गेल्या ६० वर्षांत त्यांच्यावर किती अन्याय झाला हे सांगणं गरजेचं नाही.
- तुम्हाला देखील सत्तेत येऊन सात वर्षे झाली आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी काय केले हेही सांगा.
- एखादं मूल जर कुपोषित असेल तर त्याची आई त्याला सात वर्षात चांगलं खायला देईल आणि त्यांला निरोगी करेल, कुपोषणातून बाहेर काढेल, माझं मूल कुपोषित आहे, असं सांगत फिरणार नाही.
- सरकारनं भूतकाळात न जगता वर्तमान काळात जगावं.
काश्मिरी नागरिकांना अद्याप नोकऱ्या नाहीत…
- केंद्र सरकारने काश्मिरी नागरिकांसाठी हजारो नोकऱ्या देण्याचे अश्वासन दिले होते.
- मात्र त्यांच्यासाठी आतापर्यंत काहीच केले नसल्याचे सांगितले.
- त्यामुळे मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांच्यासाठी प्रत्यक्षात काय झाले हे जाणून घेण्याची खरी गरज आहे असे मतही सुप्रिया सुळे यांनी मांडले.
- जम्मू आणि काश्मीरमधील जीडीपी आणि कर्जाचं प्रमाण चिंताजनक असून स्मार्ट सिटी हा अयशस्वी प्रकल्प असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.