मुक्तपीठ टीम
पंजाब काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. ३४ वर्षांपूर्वी झालेल्या एका वादात सिद्धू यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. खरं तर, १९८८ रोजी नवज्योत सिद्धू आणि गुरनाम सिंग यांच्यात झालेल्या वादात या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने १ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
ट्रायल कोर्टाने निर्दोष सोडले होते, उच्च न्यायालयाने निर्णय बदलला होता
- या प्रकरणात पतियाळाच्या ट्रायल कोर्टाने नवज्योत सिद्धूची निर्दोष मुक्तता केली होती.
- यानंतर गुरनाम सिंगच्या कुटुंबीयांनी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली.
- उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा निर्णय फिरवला.
- गुरनाम सिंग यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला नसून डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे झाला आहे, असे उच्च न्यायालयाने नमूद केले होते.
- या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या डॉक्टरांच्या मंडळाने डोक्याला दुखापत आणि हृदयविकार हे मृत्यूचे कारण असल्याचे नमूद केले होते.
- यानंतर उच्च न्यायालयाने सिद्धू आणि त्याचा साथीदार रुपिंदर संधू यांना दोषी ठरवले होते.
एका वाहिनीच्या कार्यक्रमात हत्येची कबुली दिली
- मात्र, नंतर सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली.
- त्यानंतर या प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले जेव्हा गुरनाम सिंगच्या कुटुंबीयांनी २०१० मध्ये एका वाहिनीच्या कार्यक्रमात सिद्धू यांनी गुरनामची हत्या केल्याची बाब मान्य केल्याची सीडी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.
- यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात सिद्धूला एक हजार रुपयांचा दंड ठोठावत सुटका केली होती.
- कुटुंबीयांनी पुनर्विचार याचिका दाखल केली, ज्यावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सिद्धूला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.