Friday, September 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कॅप्टन २५ वर्षांपासून पाकिस्तानी तुरुंगात, ८३ वर्षांच्या आईचा लढा!

न्यायालयाचा सरकारला आदेश, काय केलं ते सांगा...

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Supreme court

मुक्तपीठ टीम

८३ वर्षीय आईला तिचा हरवलेला मुलगा कॅप्टन संजीत भट्टाचार्जीचा शोध घेण्यासाठी काय पावले उचलण्यात आली आहेत याची त्रैमासिक माहिती द्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्राला दिले. कॅप्टन २५ वर्षांहून अधिक काळ पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने बेपत्ता लष्करी अधिकाऱ्याच्या आईच्या याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की, सरकारने तिच्या मुलाचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत अशी त्यांची इच्छा आहे. यावर केंद्रातर्फे हजर झालेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल केएम नटराज म्हणाले की, कॅप्टन भट्टाचार्जींचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी राजनयिक आणि इतर माध्यमांद्वारे प्रयत्न केले जात आहेत. प्रगतीची माहिती ठेवली जाईल. दुसरीकडे, पाकिस्तान सरकार आतापर्यंत भट्टाचार्जींची उपस्थिती नाकारत आहे.

लष्करी अधिकाऱ्याच्या वृद्ध आईने सांगितले की, त्यांना ३१ मे २०१० रोजी राष्ट्रपतींचे तत्कालीन लष्करी सचिव मेजर जनरल यांचे पत्र मिळाले होते. विद्यमान बेपत्ता युद्धकैद्यांच्या यादीत संजीत भट्टाचार्जी यांचे नाव जोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली. याचिकेत म्हटले आहे की, त्यांना माहिती देण्यात आली होती की, बेपत्ता संरक्षण कर्मचार्‍यांचा मुद्दा जुलै २००१ मध्ये आग्रा शिखर परिषदेसह अनेक वेळा पाकिस्तानी अधिकार्‍यांसमवेत उच्च पातळीवर उपस्थित करण्यात आला होता. मात्र संजीतचा शोध लागला नसल्याची माहिती पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिली होती.

सर्वोच्च न्यायालयाने १२ मे रोजी आईच्या याचिकेवर केंद्राला कॅप्टन संजीत भट्टाचार्जीचा शोध घेण्यासाठी उचललेल्या पावलांचा अद्ययावत स्थिती अहवाल सादर करण्यास सांगितले होते. याचिकेत म्हटले आहे की याचिकाकर्त्याला अशी माहिती मिळाली आहे की ऑगस्ट १९९२ मध्ये भारतीय सैन्याच्या गोरखा रायफल्स रेजिमेंटचे अधिकारी म्हणून नियुक्त झालेले संजीत भट्टाचार्जी लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात कैद आहेत.


Tags: Captain Sanjeet BhattacharjeeJustice DY ChandrachudJustice PardiwalaSupreme Courtकॅप्टन संजीत भट्टाचार्जीन्यायमूर्ती जेबी पार्डीवालान्यायमूर्ती डीवाय चंद्रचूडसर्वोच्च न्यायालय
Previous Post

शेअरबाजारात बनावट भाववाढ! हजार कोटींपेक्षा मोठा घोटाळा! गुजरातच्या कंपनीवर मुंबईसह देशभरात धाडी!!

Next Post

पृथ्वीच्या प्रदक्षिणेचा वेग वाढला, दिवस झाला छोटा! असं का घडतंय?

Next Post
Earth Rotation

पृथ्वीच्या प्रदक्षिणेचा वेग वाढला, दिवस झाला छोटा! असं का घडतंय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!