Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“राजकीय विचार किंवा पत्रकारांना दडपण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करू नये”

सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं निरीक्षण

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sc

मुक्तपीठ टीम

राजकीय विचार किंवा पत्रकारांना दडपण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग कधीही करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की राजकीय वर्गानेही आपल्या विचारांचं आत्मपरीक्षण केले पाहिजे जे ते देशासमोर व्यक्त करतात आणि ट्विटरच्या या युगात पत्रकारांची जबाबदारी वाढली आहे आणि त्यांनी हे लक्षात घेऊन काम केले पाहिजे.

 

न्यायमूर्ती एस.के.कौल आणि न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने पश्चिम बंगालमधील काही लेखांच्या प्रकाशनासाठी न्यूज वेब पोर्टलचे संपादक आणि इतरांविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करताना ही निरीक्षणे नोंदवली गेली. खंडपीठाने म्हटले आहे की, आपल्या विविधतेचा अभिमान बाळगणाऱ्या आपल्या देशात वेगवेगळे विचार आणि भिन्न मते असणं स्वाभाविक आहे. यामध्ये राजकीय विचारांचाही समावेश आहे. हा लोकशाहीचा गाभा आहे.

 

ट्विटरच्या युगात पत्रकारांची जबाबदारी वाढली

कोणतेही राजकीय मत दडपण्यासाठी किंवा आधीच सार्वजनिक क्षेत्रात असलेल्या एखाद्या पत्रकाराला दडपण्यासाठी राजकीय शक्तीचा वापर केला जाऊ नये, असे खंडपीठाने म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की याचा अर्थ असा नाही की पत्रकारांनी एखाद्या घटनेचे वार्तांकन करण्याची जबाबदारी कमी केली. ट्विटरच्या या युगात पत्रकारांची जबाबदारी आणखी वाढली आहे.

 

पश्चिम बंगाल सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ दवे यांनी खंडपीठाला सांगितले की, opindia.com या न्यूज पोर्टलच्या संपादकांविरुद्ध दाखल करण्यात आलेले एफआयआर मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नुपूर शर्मा, अजित भारती आणि इतरांविरुद्ध ही एफआयआर नोंदवण्यात आली आहे. याआधी, न्यायालयाने बंगालमध्ये नोंदवलेल्या नव्या एफआयआरवर पुढील कारवाईला स्थगिती दिली होती.

 

तेलेनीपारा दंगलीशी संबंधित एफआयआर

हा एफआयआर मे २०२० मध्ये बंगालमधील तेलेनिपारा येथे झालेल्या जातीय दंगलींबाबत या वेब पोर्टलवर प्रकाशित झालेल्या अहवालांशी संबंधित आहे. नुपूर शर्मा, अजित भारती आणि इतरांच्या वतीने या एफआयआरला आव्हान देणार्‍या मुख्य याचिकेत पश्चिम बंगाल सरकार आणि त्याचे “हुकूमशाही कोलकाता पोलिस” पत्रकारांना धमकावण्यासाठी एफआयआर आणि पोलिस अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा दावा केला आहे.


Tags: Supreme Courttwitterwest bengalट्विटरपश्चिम बंगालसर्वोच्च न्यायालय
Previous Post

काशी विश्वनाथ धामचे काम पूर्ण! १३ तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन

Next Post

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम १४४ लागू!

Next Post
section 144

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम १४४ लागू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!