Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आरक्षणाच्या क्रिमी लेयरबाबत केवळ आर्थिक निकषांवर निर्णय घेता येणार नाही”!

ओबीसी क्रिमी लेयरवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court - khattar

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीयांच्या ‘क्रिमी लेयर’वर महत्वाचं मत नोंदवलं. न्यायालयाच्या मते, क्रिमी लेयर केवळ आर्थिक निकषांच्या आधारे निश्चित केला जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना अॅडमिशन आणि सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवले जाईल. सर्वोच्च न्यायालयाने हरियाणा सरकारच्या ओबीसींमधील क्रिमी लेयर ठरवण्याचे निकष ठरवणाऱ्या १७ ऑगस्ट २०१६ ची अधिसूचनेवर भाष्य केले आहे. इंदिरा साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या निर्देशांचे सर्रास उल्लंघन आहे, असेही बजावलं आहे.

 

काय होती क्रिमी लेयर अधिसूचना?

  • ज्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपर्यंत आहे अशा मागासवर्गीय सदस्यांना सर्वप्रथम सेवा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशामध्ये आरक्षणाचा लाभ मिळेल.
  • ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे परंतु सहापेक्षा कमी आहे.
  • ज्यांचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना राज्य कायद्यानुसार ‘क्रिमी लेयर’ मानले जाईल.

 

न्यायालयानं काय म्हटलं?

  • न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश आणि राज्य सेवेतील नियुक्त्यांना अधिसूचनेच्या आधारे त्रास होणार नाही.
  • न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस हेही खंडपीठावर होते.
  • खंडपीठाच्या निरीक्षणातून हे समोर आले आहे की, अधिसूचना केवळ आर्थिक मापदंडांच्या आधारावर जारी केली गेली आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आजपासून तीन महिन्यांच्या कालावधीत इंदिरा साहनी प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयानुसार नवीन अधिसूचना जारी करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.

क्रिमी लेयर कशी ठरवावी?

  • न्यायालयाने म्हटले आहे की मागासवर्गीयांमधील ‘क्रिमी लेयर’ केवळ आर्थिक निकषांच्या आधारावर निर्धारित करता येणार नाही.
  • सामाजिक, आर्थिक आणि इतर संबंधित घटकांना देखील क्रिमी लेयर ठरवताना विचारात घ्यावे लागेल.

 

मागासवर्गीय कल्याण महासभा हरियाणा आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे मत व्यक्त केले. या याचिकांमध्ये राज्य सरकारने १७ ऑगस्ट २०१६ आणि २८ ऑगस्ट २०१८ रोजी जारी केलेल्या दोन अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली आहे.


Tags: HariyanaOBC reservationSupreme Courtइंदिरा साहनी प्रकरणओबीसी आरक्षणक्रिमी लेयरसरकारी नोकरीहरियाणा
Previous Post

“भाजपा राणे यांच्या पाठीशी, अटकेच्या निषेधार्थ प्रखर निदर्शने करणार”

Next Post

ज्येष्ठ संशोधक-लेखिका गेल ऑम्व्हेट यांना मान्यवरांची श्रद्धांजली

Next Post
Gail Omvedt

ज्येष्ठ संशोधक-लेखिका गेल ऑम्व्हेट यांना मान्यवरांची श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!