Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पत्नी वस्तू नाही, एकत्र राहण्यासाठी बळजबरी नको!” सर्वोच्च न्यायालयानं पतीला सुनावलं

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
supreme court 2

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाने पत्नीची इच्छा नसल्यास पती तिने आपल्या सोबतच रहावे असा दबाव तिच्यावर टाकू शकत नाही, असं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात सुनावणी करताना हे मत मांडलं आहे. पत्नी काय जंगम मालमत्ता आहे का? तिने तुमच्यासोबत जाण्याचे आदेश आम्ही कसे देऊ शकतो?,”असा सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारला.

सर्वोच्च न्यालायलामधील न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने यासंर्दभात याचिकाकर्त्याला सुनावले. “तुम्हाला काय वाटतं?, पत्नी काय एखादी वस्तू आहे का. की आम्ही तिला अशाप्रकारचा आदेश देऊ. पत्नी काय जंगम मालमत्ता आहे का. तिने तुमच्यासोबत जाण्याचे आदेश आम्ही कसे देऊ शकतो?,” असा सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारला.

पोटगी टाळण्यासाठी पतीचे प्रयत्न

गोरखपुरमधील एका कौटुंबिक न्यायालयाने हिंदू विवाह कायद्यामधील (एचएमए) कलम ९ नुसार संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या मुद्द्याच्या आधारावर १ एप्रिल २०१९ रोजी पुरुषाच्या बाजूने आदेश दिला. पत्नीने तेव्हा कौटुंबिक न्यायलयामध्ये दिलेल्या माहितीनुसार, २०१३ मध्ये लग्न झाल्यापासून पती हुंड्यासाठी माझा छळ करत असल्यामुळे मला त्यांच्यापासून दूर व्हावं लागलं, असे सांगितले होते. २०१५ मध्ये या महिलेने न्यायालयामध्ये पोटगीसाठी अर्ज केला. त्यानुसार गोरखपुर न्यायालयाने या महिलेच्या पतीला महिन्याला २० हजार रुपये पोटगी म्हणून देण्याचे आदेश दिले. यानंतर या पतीने कौटुंबिक न्यायालयामध्ये याचिका दाखल करत आपल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे अशी मागणी केली.

गोरखपुरमधील कौटुंबिक न्यायालयाने दुसऱ्यांदाही आपला आदेश कायम ठेवला. त्यानंतर पतीने अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचं सांगत याचिका फेटाळून लावली. त्यानंतर पतीने थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. आपली बाजू मांडताना या महिलेने आपले वकील अनुपम मिश्रा यांच्या माध्यमातून न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार पोटगीची रक्कम द्यायला लागू नये म्हणून पतीचे हे सर्व प्रयत्न सुरु असल्याचा दावा केला. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान पतीच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाने या महिलेने तिच्या पतीसोबत परत जावं असा आदेश दिला पाहिजे अशी मागणी केली.

न्यायालयाने संविधानातील अधिकारांच्या संरक्षणाचा पतीच्या याचिकेमधील मुद्दा फेटाळून लावला. अलहाबाद न्यायालयाने पोटगीसंदर्भातील आदेश दिल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. “तुम्ही इतके बेजबाबदार कसे असू शकता? ते महिलेसोबत एखादी मालमत्ता असल्याप्रमाणे वागत आहेत. ती काही वस्तू नाहीय,” अशा शब्दांमध्ये न्यायालयाने पतीची बाजू मांडणाऱ्या वकिलाला खडसावले. बळजबरी करुन महिलेला पतीसोबत राहण्याची सक्ती करु शकत नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच यासंदर्भात आम्ही आदेश देण्याचा काही प्रश्नच येत नाही असंही खंडपीठाने म्हटलं आहे.


Tags: Supreme Courtकौटुंबिक न्यायालयपोटगीसर्वोच्च न्यायालय
Previous Post

गुन्हे महत्त्वाचे : 1)ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत एका तरुणाने आपल्या मालकाच्या पत्नीची हत्या केली. मालकाच्या पत्नीकडे त्याने शरीरसुखाची मागणी केली. विरोध केल्यानंतर त्याने तिची हत्या केली. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात आरोपी तरुणाला अटक केली. गुड्डू कुमार उर्फ रंजन असे आरोपीचे नाव आहे. आरोपी तरूण हा डोंबिवलीतील एका किराणा दुकानात काम करत होता. 2)कौटुंबिक कलहातून वडिलाने ब्लेडने गळा चिरून दोन वर्षीय मुलीची हत्या केली. त्यानंतर ब्लेडने स्वत:च्याही गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना बुटीबोरीतील गणेशपूर परिसरात सोमवारी सायंकाळी घडली. राधिका किशोर सोयाम, असे मृत चिमुकलीचे तर किशोर सुखदेव सोयामअसे मारेकरी वडिलाचे नाव आहे. 3)साताऱ्यातील सासवड (ता फलटण) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी चक्क पेट्रोल वाहून नेहणारी उच्च दाबाची पाइपलाइन फोडली आणि दोन हजार लिटर पेट्रोल लंपास करण्यात आलं. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरील २२३ किलोमीटरच्या पाइपलाइनला साताऱ्यातील सासवड गावाजवळ मोठं भगदाड पाडलं. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेत भगदाड बंद करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. 4)जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. 5) नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 4 येथे वास्तव्यास असलेले प्रकाश शेट्टीयांचे घर काही दिवसांपासून बंद होते. याचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून सुमारे 4 लाख 80 हजार रुपये किमतीचं सोनं लंपास केलं आहे

Next Post

कॅरेक्टर्स फक्त २८०…शक्ती सत्तेला हादरवणारी!

Next Post
कॅरेक्टर्स फक्त २८०…शक्ती सत्तेला हादरवणारी!

कॅरेक्टर्स फक्त २८०...शक्ती सत्तेला हादरवणारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!