Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

परमबीर सिंग यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला

March 24, 2021
in घडलं-बिघडलं
0
parambir singh (2)

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणार्‍या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना प्रथम उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर मानले आहेत. सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयातील आपली याचिका मागे घेतली असून आपण मुंबई उच्च न्यायालयात जात असल्याचे सांगितले आहे.

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मुंबईचे माजी पोलिस आयुक्तांनी महाराष्ट्रातील गृहमंत्र्यांवर केलेले आरोप खूप गंभीर आहेत. सीबीआय चौकशीची मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात का गेला नाहीत, असे परमबीर सिंगच्या वतीने उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिवक्ता मुकुल रोहतगी यांना न्यायालयात विचारले. याप्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना पक्षकार का केलं नाही? असा सवाल केला.

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून करण्यात आलेली बदली बेकायदेशीर असून, ती रद्द करण्यात यावी आणि पुढील कारवाईपासून संरक्षण मिळावं, अशा मागण्या सिंह यांनी याचिकेत केल्या होत्या.

परमबीर सिंग यांचा आरोप

  • परमबीर यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, देशमुख यांनी गेल्या फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या निवासस्थानी पोलिस अधिकाऱ्यांसमवेत बैठक केली होती, ज्यात गुन्हे गुप्तचर विभाग म्हणजेच सीआययूचे सचिन वाझे आणि मुंबईच्या समाजसेवा शाखेचे एसीपी संजय पाटील हे सुद्धा या बैठकीत आले होते.
  • या पोलिस कर्मचाऱ्यांना मुंबईतील विविध बार,रेस्ट्रॉरंटकडून दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे आदेश देण्यात आले.
  • देशमुख विविध प्रकरणांच्या चौकशीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. देशमुख आपल्या पदाचा गैरवापर करत आहे. असा आरोप त्यांनी केला.

Tags: anil deshmukhparambir singhगृहमंत्री अनिल देशमुखपरमबीर सिंगसर्वोच्च न्यायालय
Previous Post

*मनोरंजन महत्त्वाचे*: १. लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आता लवकरच अॅनिमेटेड स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही मालिका खास लहान मुलांसाठी बनविण्यात आली आहे. २. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा नुकताच आलेला टीव्हीवरील ‘डान्स दीवाने ३.’या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान, हेलन आणि आशा पारेख या हजेरी लावणार आहेत. तर माधुरीने त्यांच्यासोबत डान्स केला असून सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ३. अभिनेत्री एरिका फर्नाडिस म्हणजेच ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील प्रेरणा. ही नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या ती मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. यामुळे तिचे हॉट लूकमधील फोटो चर्चेत आहेत. ४. मराठमोळी अभिनेत्री तसेच लावणीची क्विन म्हणजेच मानसी नाईक आपल्या हॉट अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. मानसीने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मानसीने बाथरुममध्ये फोटोशूट केले आहे. यात ती सुंदर दिसत आहे. ५. आता बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरे’ आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ चित्रपट एकाच दिवशी म्हणजे ९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहेत. एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित होणे हे काही नवीन नाही. परंतु बाप-लेकाचे हे चित्रपट एकाच दिवशी येत आहेत म्हणून ही चर्चा रंगली आहे.

Next Post

कोरोना लॉकडाऊन लोकांना भोवला, सरकारला पावला! कसा ते पाहा…

Next Post
petrol

कोरोना लॉकडाऊन लोकांना भोवला, सरकारला पावला! कसा ते पाहा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!